महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाला २३ नोव्हेंबर रोजी लागला. विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला ५० जागांवर विजय मिळवला. या निकालानंतर विरोधी पक्षातील उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली होती. यामुळे अनेक उमेदवारांनी निवडणुक आयोगाकडे फेर मतमोजणीची मागणी केली होती. या मागणीला उत्तर देत केंद्रीय निवडणूक आयोग काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभ निवडणुकीच्या मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला होता. या आरोपांवर चर्चा करण्यासाठी निवडणुक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आमंत्रण दिले आहे. या चर्चेसाठी निवडणुक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ३ डिसेंबरला आमंत्रित केले आहे.
निवडणुक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक पारदर्शक पद्धतीने झाली आहे. निवडणुकीतील प्रत्येक टप्यांवर उमेदवारांच्या सहभागासह त्यांची प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली आहे. चर्चेमध्ये काँग्रेसच्या सर्व शंकाचे आणि समस्यांचे पूर्तता करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे.