लंडन : इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सला तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू पुन्हा फाटल्यामुळे त्याला उपचार घ्यावे लागणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. (Ben Stokes)
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात ३३ वर्षीय स्टोक्सला दुखापतीमुळे तिसऱ्या दिवशी मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर तो फलंदाजीसही आला नव्हता. या वर्षी ऑगस्ट महिन्यात हंड्रेड स्पर्धेमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघातर्फे खेळताना त्याच्या मांडीचा स्नायू फाटला होता. या दुखापतीमुळे त्याला दोन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्यानंतर, पुन्हा ही दुखापत उद्भवल्याने स्टोक्सवर जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे ईसीबीने सांगितले आहे.
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या इंग्लंड संघातही स्टोक्सचा समावेश करण्यात आला नव्हता. त्याला वैद्यकीय कारणास्तव संघाबाहेर ठेवण्यात आल्याचे ईसीबीने सांगितले होते. आता तो तीन महिने क्रिकेटला मुकणार असल्याने मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील त्याच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह आहे. (Ben Stokes)
🚨 Injury news
We have an update on England Men’s Test captain, Ben Stokes 👇
— England Cricket (@englandcricket) December 23, 2024
हेही वाचा :