महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उद्या (दि. ३)घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यासाठी देवस्थान समितीने सर्व ती सज्जता केली आहे. (Shardiya Navratri 2024 )
१) नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.
२) मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट अंतिम टप्प्यात असून, बुधवारीही येथे लगबग सुरू होती. (Shardiya Navratri 2024 )
३) मंदिरात गरूड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, तेथे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
४) मंदिरातून गावोगावी दुर्गामाता ज्योत घेऊन जाणारे भाविक.
५) मंदिरातील गरूड मंडपाच्या प्रतिकृतीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
६) करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाई देवीसाठी ४५ तोळे सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते ही प्रभावळ देवस्थान समितीकडं सुपूर्द करण्यात आली. यावेळी महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल, गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुधले, वसंत पंदरकर, भरत ओसवाल , देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, रामाराव, महादेव दिंडे आदी उपस्थित होते.