महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले. तसेच यावेळी राजकीय अपेक्षा काही करु नये, असे सांगत कार्यकर्त्यांना सल्ल्याच्या चार गोष्टी सांगितल्या. मागील दहा वर्षांत जो त्रास झाला आहे, तो संपवण्यासाठी आता निर्णय घेऊ या, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. (Harshvardhan Patil)
कार्यकर्त्यांना विचारून निर्णय
इंदापूर हा स्वाभिमानी तालुका आहे. आज अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे सांगत कार्यकर्त्यांना भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जायाचे का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी हो सांगितले. त्यानंतर आपण ही घोषणा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांसोबत बैठक
शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. तालुक्यातील लोकांचा तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह असल्याचे पवार साहेब म्हणाले. याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. भाजप सोडण्याचा निर्णय त्यांना सांगितला. तालुक्यातील जनतेला काय वाटते त्याचा आदर मी करणार आहे. त्यावर जो निर्णय घ्यायचा तो घ्या, असे फडणवीस म्हणाले. त्यानंतर मी पवार साहेबांना विधानसभा निवडणुकी संदर्भात भेटलो. (Harshvardhan Patil)
हेही वाचा :