कनौज : उत्तर प्रदेशच्या कन्नौज रेल्वे स्थानकावर शनिवारी बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. (Building Collapse)
आतापर्यंत सहा कामगारांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘प्राथमिक माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या छताचे शटरिंग कोसळल्याने ही घटना घडली,’ असे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) शुभ्रांत कुमार शुक्ल यांनी सांगितले. सध्या त्यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बचाव कार्य आणि देखरेख सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करण्याला आमचे सध्या प्राधान्य आहे. बचाव कार्यासाठी आम्ही सर्व ती संसाधने वापरत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Building Collapse)