कोटा : राजस्थान राज्यातील झालावाड जिल्ह्यातील पिपलोद गावात एका सरकारी शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळून किमान सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि २९ विद्यार्थी जखमी झाले. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहेआज शुक्रवारी सकाळी पावनेआठ वाजण्याच्या सुमारास उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थी सकाळच्या प्रार्थनेसाठी जमले असताना ही घटना घडली. (School collapses in Rajasthan)
दांगीपुरा पोलिस स्टेशनचे एसएचओ विजेंद्र सिंह यांनी सांगितले की, जेव्हा सहावी आणि सातवीच्या वर्गखोल्यांचा एक भाग कोसळला तेव्हा इमारतीत अंदाजे २९ विद्यार्थी उपस्थित होते. मानहोरेथाना पोलिस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर नंदकिशोर यांनी या घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. “आठ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांना उच्च वैद्यकीय केंद्रात उपचारास करण्यात आले आहे, तर सहा जण झालेवाड येथे उपचार घेत आहेत,” असे त्यांनी सांगितले. (School collapses in Rajasthan)
अधिकाऱ्यांनी सांगितले की शाळेत सुमारे २७ विद्यार्थी आहेत आणि इमारत कोसळल्यानंतर लगेचच बचाव कार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, असे एसएचओने सांगितले.
या घटनेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला. “झालावाडमधील पीपलोडी येथे शाळेचे छत कोसळल्याने झालेला दुर्दैवी अपघात अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. जखमी मुलांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,” असे शर्मा म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. “झालावाडच्या मनोहर ठाण्यात सरकारी शाळेची इमारत कोसळून अनेक मुले आणि शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. जीवितहानी कमीत कमी व्हावी आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असे गेहलोत यांनी एक्स् वर पोस्ट केली.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मदन दिलावर म्हणाले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि स्थानिक अधिकारी शाळेच्या परिसरातील इतर इमारतींच्या संरचनात्मक स्थिरतेची देखील तपासणी करत आहेत. (School collapses in Rajasthan)
अत्यंत दुःखद घटना: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेला “अत्यंत दुःखद” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटनास्थळी अधिकारी सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. “माझ्या संवेदना बाधित विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.”
“या कठीण काळात माझ्या संवेदना बाधित विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. अधिकारी बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहेत,” असे त्यांनी म्हटंले आहे.
राजस्थानचे शालेय शिक्षण मंत्री मदन दिलावर म्हणाले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. “आम्ही शाळेच्या कॅम्पसमधील इतर इमारतींच्या संरचनात्मक स्थिरतेची देखील तपासणी करत आहोत,”