महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. परंतु, या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. (Border – Gavaskar Trophy)
मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला होता. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५०ला सुरूवात झाली होती. मालिकेतील दुसरा सामना हा डे-नाईट पद्घतीने खेळवण्यात आला. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० ला सुरू झाला. या सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारतीय संघाची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. यानंतर गाबा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याला पहाटे ५.५० ला सुरूवात होणार आहे.
गाबा स्टेडियमर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक पहाटे ५.२०ला होणार आहे. तर सामन्याला सुरूवात ५.५० ला होणार आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी पहाटे उठावे लागणार आहे. गाबा कसोटीला पहाटे सुरूवात होणार असल्याने सामना दुपारी दोनच्या सुमारास होईल. तर मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. (Border – Gavaskar Trophy)
हेही वाचा :