महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा ३२३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिका २-० ने जिंकली आहे. इंग्लंडने या सामन्यावर पकड कायम ठेवली होती. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर ५८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, न्यूझीलंडचा दुसरा डाव २५९ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार बेन स्टोक्सने तीन, तर ख्रिस वोक्स, ब्रेडन कारसे आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (NZ vs ENG)
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेलने शतक झळकवून संघर्ष केला. परंतु, त्याला दुसऱ्या फलंदाजांनी साथ दिली नाही. ब्लंडेलने १०२ चेंडूंत १३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ११५ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी न्यूझीलंडला सामन्यात विजयी करू शकली नाही. या विजयासह इंग्लंडने १६ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली आहे.
इंग्लंडने पुनरागमन करत हा सामना जिंकला. पहिल्या डावात हॅरी ब्रूकने महत्वाची शतकी खेळी केली. ब्रुकच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात २८० धावा केल्या. गस ऍटकिन्सन आणि कारसे यांनी अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव १२५ धावांत आटोपला आणि १५५ धावांची आघाडी घेतली. (NZ vs ENG)
रूटचे ३६ वे शतक
पहिल्या डावात लवकर डाव गुंडाळल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली. बेन डकेटने ९२ आणि जेकब बेथेलने ९६ धावांची खेळी केली. तर जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३६ वे शतक झळकावून इंग्लंडची आघाडी ५०० च्या पुढे नेली. इंग्लंडने आपला दुसरा डाव ६ बाद ४७२ धावांवर घोषित करत सामन्यात एकूण ५८२ धावांची आघाडी घेतली. रुटने १३० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या.
न्यूझीलंड डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीतून बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंड डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला आहे.
Test victory. Series victory. pic.twitter.com/kEtytT6sMM
— England Cricket (@englandcricket) December 8, 2024
हेही वाचा :