नवी मुंबई : भारतीय महिला संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी-२०मध्ये भारतावर ९ विकेटनी सहज विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. (Indian women Team)
नेरुळमधील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५९ धावा केल्या. स्मृती मानधना वगळता भारताच्या कोणत्याही फलंदाजास अर्धशतकापर्यंत मजल मारता आली नाही. स्मृतीने ४१ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकारासह ६२ धावांची खेळी केली. तिच्याखालोखाल रिचा घोषने १७ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ३२ धावांची खेळी केली. विंडीजच्या डिएंड्रा डॉटिनने १४ धावांत २ विकेट घेतल्या.
भारताचे आव्हान वेस्ट इंडिजने १५.४ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पार करून विजय साकारला. विंडीजची सलामीवीर हेली मॅथ्यूजने कॅप्टनला साजेशी खेळी करत ४७ चेंडूंमध्ये १७ चौकारांसह नाबाद ८५ धावा फटकावल्या. तिने क्विआना जोसेफसह (३८ धावा) ६६ धावांची सलामी दिली, तर शर्माइन कॅम्पबेलसह (नाबाद २९) दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावा जोडल्या. या मालिकेतील तिसरा सामना १९ डिसेंबर रोजी रंगणार आहे. (Indian women Team)
West Indies win the 2nd T20I and level the series 1⃣-1⃣
Scorecard ▶️ https://t.co/msHanvwQsI#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/41XLmKDvnI
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2024
हेही वाचा :