कोल्हापूर : प्रतिनिधी : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची २३ लाख १९ हजार ४४९ रुपये इतकी रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने मे. वारणा इंडस्ट्रीज लिमिटेड संभापूर, ता. हातकणंगले या कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (provident fund )
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालय येथील अधिकारी हेमंत श्रीनिवासराव जेवळीकर (वय ५७, रा. चौगुले गल्ली, कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली आहे. (provident fund )
संभापूर येथील वारणा इंडस्ट्रिज येथील कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीतील रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूर येथे न भरता स्वत:च्या फायद्याकरिता वापरली असल्याची फिर्याद दिली आहे. फसवणुकीतील रक्कम २३ लाख १९ हजार ४४९ रुपये इतकी आहे. वारणा इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीचित्रसेन नागनाथ गुळवे, संचालक सुरेश चित्रसेन गुळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती महाजन, संचालक हरिदास चांगदेव जोधावे, संचालक स्वाती चित्रसेन गुळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :