नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली असून हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर राहिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उर्जा सुरक्षा ही आमच्या भागीदारीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि हे दोन्ही बाजूंनी फायदेशीर सहकार्य सुरू ठेवू असा निर्धारही मोदी यांनी यांनी व्यक्त केला. प्रगत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रशिया भारताला अखंडपणे इंधनाची निर्यात करेल अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी दिली. दोनही देशांनी उर्जा सुरक्षा आणि दहशतवादाशी लढण्याचा निर्धार केला. (Putin assures that fuel trade will continue)
भारताने रशियाकडून तेल खरेदी करु नये, असा दम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. ट्रम्प यांच्या धमकीकडे दुर्लक्ष करत भारत आणि रशियातील इंधन व्यापार यापुढे कायम राहिल याची ग्वाही दोन्ही देशांच्या नेत्यांनी दिली. हा व्यापार २०३० पर्यंत कायम राहण्याचा करारही करण्यात आला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे २३ व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर आले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. २०३० पर्यंत आर्थिक सहकार्य करण्याची घोषणाही करण्यात आली. त्यानंतर दोन्ही नेत्याची संयुक्त पत्रकार परिषद झाली. (Putin assures that fuel trade will continue)
भारत-रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी अढळ
पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रपती पुतीन यांनी धोरणात्मक भागीदाराचा पाया घातला याकडे लक्ष वेधत भारत आणि रशियातील मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी अढळ राहिली आहे, असा विश्वास व्यक्त केला. हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर बांधले आहे. आज आम्ही या नात्याला बळकट करण्यास मदत करणाऱ्या सर्व घटकांवर चर्चा केली आहे, असे मोदी म्हणाले.
उर्जा सुरक्षा ही आमच्या भागीदारीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि हे दोन्ही बाजूंनी फायदेशीर सहकार्य सुरू ठेवू असा निर्धारही मोदी यांनी यांनी व्यक्त केला. नागरी अणुउर्जेतील आमचे सहकार्य दशाकांपासून चालले आहे आणि स्वच्छ उर्जेमध्ये योगदान देत आहे.
पुतीन यांनी मानले राष्ट्रपती मुर्मू यांचे आभार
पुतीन यांनी वेगाने प्रगती करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आम्ही इंधनाची अखंडीत निर्यात सुरू ठेवण्यास तयार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. रशिया प्रतिनिधींचे आदरातिथ्यपूर्ण स्वागत केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे आभार मानले. गेल्या वर्षी भारत रशिया द्विपक्षीय व्यापारात १२ टक्क्यांनी वाढ झाली असून ज्यामुळे एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. पुढील वर्षाचा व्यापारी करार असाच प्रभावी राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत आणि रशियामध्ये उर्जेची यशस्वी भागिदारी सुरू असून तेल, वायू, कोळसा आणि भारताच्या उर्जेसाठी उर्जेच्या गरजांसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा स्थिर पुरवठा कायम राहिल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (Putin assures that fuel trade will continue)
दहशतवादाविरोधात खांद्याला खांदा लावून लढणार
राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणाले, भारत आणि रशिया दहशतवादाविरुद्धच्या लढाईत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला असो किंवा क्रोकस सिटी हॉलवरील भ्याड हल्ला असो, या सर्व घटनांचे मूळ एकच आहे. भारताचा अढळ विश्वास आहे की दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर थेट हल्ला आहे आणि त्याविरुद्ध जागतिक एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. भारत आणि रशियाचे संयुक्त राष्ट्र, जी२०, ब्रिक्स, एससीओ आणि इतर व्यासपीठांवर घनिष्ठ सहकार्य आहे. आम्ही या सर्व व्यासपीठांवर आमचा संवाद आणि सहकार्य सुरू ठेवू.
लष्कराच्या आधुनिकीकरणास मदत करणार
पुतीन म्हणाले, गेल्या अर्ध्या शतकापासून आपला देश भारतीय सैन्याला, ज्यामध्ये हवाई संरक्षण दल, विमान वाहतूक आणि नौदलाचा समावेश आहे, शस्त्रास्त्रे आणि आधुनिकीकरण करण्यास मदत करत आहे. सर्वसाधारणपणे, आम्ही नुकत्याच झालेल्या वाटाघाटींच्या निकालांवर निःसंशयपणे समाधानी आहोत… मी माझा विश्वास व्यक्त करू शकतो की सध्याची भेट आणि झालेले करार आमच्या देशांच्या आणि लोकांच्या, भारत आणि रशियाच्या लोकांच्या फायद्यासाठी रशिया-भारतीय धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यास मदत करतील. (Putin assures that fuel trade will continue)