वडोदरा : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूलाचा एक भाग कोसळून झालेल्या अपघातात आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दहा जण गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती प्रशासनाला कळाली. जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. वडोदरा शहरापासून २५ किलोमीटर लांब हा पूल आहे. सौराष्टकडे जाणाऱ्या वाहनासाठी हा एक महत्वाचा पूल आहे. (Gujrat bridge collapse)
मध्य गुजरात आणि सौराष्ट्र यांना जोडणारा महिपूर नदीवरील पद्रा मुजपूर मार्गावर हा अपघात झाला. पूल मधून तुटला असल्याने तीन ते चार वाहने पूलावरुन खाली पडली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिल्हा प्रशासनाला ही माहिती कळाली. स्वत: जिल्हाधिकारी आनंदकुमार यांच्यासह पोलिस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, आपत्कालिन विभागाचे कर्मचारी पोचले. (Gujrat bridge collapse)
सुरवातीच्या वृत्तानुसार एक ट्रक, एक व्हॅन, एक कार पूल ओलांडत असताना पूल तुटला आणि ही वाहने नदीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालिन सेवांना या संबधी कळवण्यात आले. घटनास्थळी पोलिस, आपत्ती निवारण पथके दाखल झाली. त्यांनी वाहनातून जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. (Gujrat bridge collapse)
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता घटना घडल्याचे सांगितले. पुलाचा एक भाग अचानक कोसळला. त्या भागातून जाणारी वाहने नदीत पडली. आम्ही बचाव कार्य सुरू केले आहे आणि दहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी रस्त्यांवर
जर्मनीच्या विमानावर चीनचा लेसर हल्ला