लखनौ : पंजाबच्या सीमावर्ती भागातील पोलीस आस्थापनांवर ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असलेले खलिस्तान जिंदाबाद फोर्सचे (केझेडएफ) तिघे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात ही चकमक झाली. पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिस दलाने ही संयुक्त मोहीम राबवली होती. (police encounter )
गुरविंदर सिंग (२५), वीरेंद्र सिंग उर्फ रवी (२३) आणि जसन प्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग (१८, सर्व रा. गुरुदासपूर) अशी मृतांची नावे आहेत.
पंजाब पोलिसांनी सकाळी या तिघांना अटक केल्याचे सांगितले, तर उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नंतर तिघांचा मृत्यू सकाळी १० वाजण्यापूर्वी झाला होता, असे सांगितले.(police encounter )
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी म्हटले आहे की, ‘पाक-प्रायोजित खलिस्तान जिंदाबाद फोर्स (केझेडएफ) दहशतवादी मॉड्यूलविरोधात ही मोठी कारवाई करण्यात यश मिळाले आहे. यूपी पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईवेळी तिघांशी पोलिसांशी चकमक झाली. या तिघांना पोलिस दलावर गोळीबार केला.
जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी पुरणपूर येथे नेण्यात आले. तथापि, त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन एके-४७ रायफल आणि दोन पिस्तूल जप्त केल्याचे यादव यांनी म्हटले आहे.
गोळीबारात सुमित राठी आणि शाहनवाज हे दोन पोलीस हवालदार जखमी झाले. यूपी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान या जवानांचा मृत्यू झाला.(police encounter )
यूपी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाब पोलिसांना प्रथम पिलीभीतमध्ये संशयित असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे शोधमोहिमेसाठी यूपी पोलिसांशी समन्वय साधला.
पोलिसांनी सांगितले की, जेव्हा ते समोरासमोर आले तेव्हा त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तिघे संशयित जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेश पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ यश यांनी एका निवेदनात गुरदासपूरमधील पोलिस चौकीवर झालेल्या हल्ल्यात या तिघांचा सहभाग होता.
In a major breakthrough against a #Pak-sponsored Khalistan Zindabad Force(KZF) terror module, a joint operation of UP Police and Punjab Police has led to an encounter with three module members who fired at the police party.
This terror module is involved in grenade attacks at…
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) December 23, 2024
हेही वाचा :
पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले
एक लाखाहून अधिक किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक