नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा उल्लेख संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अलिकडच्या मॉनिटरिंग टीमच्या अहवालात करण्यात आला आहे. (TRF name in UNSC)
त्यामुळे भारताचा हा राजनैतिक विजय मानला जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) च्या महत्त्वाच्या अहवालात टीआरएफचे नाव आहे. पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचा फोटो या संघटनेने प्रकाशित केला होता. तसेच दोनदा जबाबदारीही स्वीकारली होती.
सरकारी सूत्रांनुसार, अहवालात २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या या प्रॉक्सी संघटनेचा सहभाग स्पष्टपणे नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला होता. (TRF name in UNSC)
टीआरएफ आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर या अहवालात स्वतंत्र परिच्छेद हा पहिला भाग आहे. दक्षिण आशिया विभागात तो सर्वांत मोठा आहे.
टीआरएफ आणि एलईटी यांच्यात संबंध आहेत. त्यांना पाकिस्तानकडून पाठिंबा मिळतो, हे आम्ही वारंवार सांगत आहोत. अहवालात या उल्लेखामुळे आमचा दावा मजबूत होतो, असे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, २०१९ नंतर अहवालात आलेला लष्कर-ए-तोयबाचा हा पहिला उल्लेख आहे. (TRF name in UNSC)
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, टीआरएफने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी दोनदा स्वीकारली होती आणि “हल्लास्थळाचे छायाचित्र प्रकाशित केले होते.”
पथकाने एका अहवालात असेही म्हटले आहे की पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या पाठिंब्याशिवाय हा हल्ला होऊ शकला नसता.
“हल्ला त्याच दिवशी द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने केला होता, ज्याने समांतरपणे हल्ल्यास्थळाचे छायाचित्र प्रकाशित केले होते,” असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ आयएसआयएल (दाएश) आणि अल-कायदा प्रतिबंध समितीला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. (TRF name in UNSC)
अहवालात म्हटले आहे की, टीआरएफने ‘जबाबदारीचा दावा’ दुसऱ्या दिवशी पुन्हा केला. तथापि, २६ एप्रिल रोजी टीआरएफने आपला दावा मागे घेतला. टीआरएफकडून पुढे कोणताही संवाद झाला नाही. इतर कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारली नाही, असे त्यात म्हटले आहे. अहवालात एका सदस्य देशाचा उल्लेख केला आहे. त्याने ‘‘लष्कर-ए-तैयबाच्या पाठिंब्याशिवाय हल्ला होऊ शकला नसता आणि एलईटी आणि टीआरएफ यांच्यात संबंध होता. दुसऱ्या सदस्य देशाने म्हटले आहे की हा हल्ला टीआरएफने केला होता, जो एलईटीशी संबंधित आहे.’’