महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचे काम सध्या सुरू आहे. ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. त्याचवेळी वाहतूक क्षेत्रांत क्रांती घडवणारा आणखी एक टप्पा दृष्टिपथात आला आहे. तो आहे हायपरलूपचा. गुरुवारी हायपरलूप ट्रॅकची चाचणी पार पडली. या माध्यमातून भारताने हायपरलूप युगाच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले. (Hyperloop train)
४०० मीटर ट्रॅकवर ही पहिली चाचणी झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून चाचणी यशस्वी झाल्याची माहिती दिली. हायस्पीड ट्रेनसारखाच मात्र हायपरलूप तंत्रज्ञानात प्रवास व्हॅक्यूम ट्यूबमधून होतो. त्याचा वेग विमानाच्या वेगाशी स्पर्धा करणारा असतो.
२०२२ मध्ये रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आयआयटी-मद्रासला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी हायपरलूप तंत्रज्ञानासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली होती. तसेच रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी सुरुवातीला ८.३४ कोटीची तरतूदही केली होती. या प्रयत्नाला या चाचणीमुळे यश आले. अशा भावना रेल्वेमंत्र्यांनी आविष्कार हायपरलूप टीमशी संवाद साधताना व्यक्त केल्या. तसेच या टीमच्या दूरदृष्टीची आणि हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसाही त्यांनी केली.
- भारत हायपरलूप युगाच्या दिशेने
- ४१० मीटर ट्रॅकची ताशी १०० किमी वेगाने चाचणी यशस्वी
- ४१० मीटरसाठी ४०० टनांपेक्षाही जास्त स्टीलचा वापर
- भविष्यात प्रवास होणार ६०० ते १००० किमी वेगाने
- दळणवळणातील नाविन्यपूर्ण आणि तांत्रिक प्रगतीचा आविष्कार
- भारतीय रेल्वे, आयआयटी मद्रास, आविष्कार हायपलूप टीम यांच्या संयुक्त भागीदारीतून ट्रॅक उभारणी
Watch: Bharat’s first Hyperloop test track (410 meters) completed.
Team Railways, IIT-Madras’ Avishkar Hyperloop team and TuTr (incubated startup)
At IIT-M discovery campus, Thaiyur pic.twitter.com/jjMxkTdvAd
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 5, 2024
हेही वाचा :