इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांचा नातू जैद हुसेन नवाज याचा विवाह या आठवड्यात लाहोरमध्ये होणार आहे. विवाहाची जोरदार तयार सुरू आहे. जगभरातील व्हीआयपी या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची चर्चा पाकिस्तानात सुरू आहे. (zaid nawaz)
नवाज शरीफ यांचा नातू जैद हुसेन नवाजच्या विवाह सोहळ्याच्या विधींना २५ डिसेंबरला सुरूवात होणार आहे. ते २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. विवाहामध्ये होणारे विधी लाहोरमधील शरीफ परिवाराचे वास्तव्य असलेल्या उमरामध्ये होणार आहेत.
पाकिस्तानच्या ट्रिब्यून या दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा भव्य दिव्य होणार आहे. शरीफ यांचे जगभरातील नातेवाईक, मित्रांचे आगमन सुरू झाले आहे. २५ डिसेंबरला हळदीने विवाह सोहळ्याची सुरुवात होणार आहे. २७ डिसेंबरला विवाह सोहळा तर २९ डिसेंबरला स्वागत समारंभ होणार आहे. (zaid nawaz)
भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रणाची चर्चा
विवाह सोहळ्यात अमेरिका, यूके, सौदी अरब, कतार, भारतासह अन्य देशांचे मान्यवर सहभागी होणार आहेत. व्हीआयपी आणि मान्यवरांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असल्याचा दावा केला जात आहे. पण शरीफ परिवार आणि भारताच्या प्रतप्रधान कार्यालयाने निमंत्रणाच्या निर्णयाला दुजारो दिलेला नाही. पंतप्रधान मोदी आणि नवाज शरीफ यांचे संबंध चांगले असल्याने शरीफ परिवारांच्या मेहमान लिस्टमध्ये त्यांचे नाव असल्याचा दावा केला जात आहे.
२०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी लाहोरमध्ये जाऊन नवाज शरीफ यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी शरीफ यांची नात मेहरुन्निसा (मरियम नवाज यांची मुलगी) विवाहालाही मोदींना आमंत्रित केले होते. त्यामुळे यावेळी नवाज शरीफ यांनी नातवाच्या विवाहाला पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. पण त्याबद्दल अधिकृत घोषणा झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा: