- अरुण कुमार गोंड
भारतीय ग्रामीण समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना परंपरेने सामूहिकता, सहभाग आणि सहअस्तित्व यांवर आधारलेली होती. तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असल्यामुळे मनोरंजन हे केवळ वेळ घालवण्याचे माध्यम नव्हते, तर सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचे प्रतीक होते.(Ott platforms the end of shared entertainment experiences)
त्या काळात पाहणे-ऐकणे ही फक्त वैयक्तिक क्रिया नव्हती; ती सामूहिक अनुभवाची एक उत्सवी प्रक्रिया होती. बहुतांश ग्रामीण घरांमध्ये दूरदर्शन उपलब्ध नसे आणि मोबाईल किंवा इंटरनेटसारखी साधने तर अत्यंत मर्यादित होती. त्यामुळे मनोरंजन ही एक सामायिक सामाजिक घटना ठरत असे. ती समाजातील सामूहिक भावनेला बळ देत असे आणि व्यक्ती व समूह यांच्यातील संतुलन टिकवून ठेवत असे. (Ott platforms the end of shared entertainment experiences)
मात्र आज “संस्कृती उद्योग” ही संकल्पना वेगळे संकेत देते. ओटीटी प्लॅटफॉर्म — म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून थेट चित्रपट, मालिका किंवा व्हिडिओ पोहोचवणाऱ्या डिजिटल सेवा — या आता केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिलेल्या नाहीत; त्या एक संपूर्ण व्यवस्था बनल्या आहेत.
बाजारपेठेने नियंत्रित केलेली संस्कृती
आता संस्कृती ही समाजातून नैसर्गिकपणे जन्म घेणारी प्रक्रिया राहिलेली नाही. ती बाजारपेठेने नियंत्रित केली जाणारी गोष्ट बनत चालली आहे. काय तयार होईल, कसे तयार होईल आणि कोणासाठी तयार होईल हे आता नफा, प्रेक्षकसंख्या आणि ग्राहकांचा डेटा ठरवतो. पारंपरिक सामूहिक अनुभव, कौटुंबिक संवाद आणि स्थानिक सांस्कृतिक प्रथा कमकुवत करतात. (Ott platforms the end of shared entertainment experiences)
समाजशास्त्रज्ञ जिग्मंट बॉमन यांच्या ‘लिक्विड मॉडर्निटी’ अर्थात ‘तरल आधुनिकता’च्या संकल्पनेतून पाहिले, तर ओटीटी संस्कृती झटपट समाधान, सतत बदलणाऱ्या आवडी आणि ‘बिंज-वॉचिंग’च्या सवयींना प्रोत्साहन देते. म्हणजे एका भागानंतर पुढचा भाग आपोआप सुरू होणे. अशा परिस्थितीत मनोरंजन हे टिकाऊ सामाजिक नात्यांऐवजी क्षणिक उपभोगाचे साधन बनते.
गावातील जुन्या काळाचे चित्र (Ott platforms the end of shared entertainment experiences)
याच्या उलट, गावांतील जुन्या काळाचे चित्र पूर्णपणे वेगळे होते.
गावातील मोजक्याच घरांमध्ये दूरदर्शन संच असायचे. तेही बहुतेक ब्लॅक व्हाईट. त्यावर अँटेना बसवलेला असे आणि वारा वा हवामानानुसार चित्र कधी स्पष्ट तर कधी धूसर दिसे. पडद्यावर मुंग्या, मुंगळे येत. संध्याकाळ होताच मुलांपासून महिलांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये एकच उत्सुकता असे — “आजचा कार्यक्रम पाहायचा!” (Ott platforms the end of shared entertainment experiences)
टीव्ही सुरू होताच शेजारीपाजारी लोक हळूहळू त्या अंगणात किंवा ओट्यावर जमा होऊ लागत. जमिनीवर पोती, चटया किंवा दऱ्या अंथरल्या जात. जागा कमी पडली तर कुणी खिडकीबाहेर उभे राहूनही कार्यक्रम पाहत असे.
हे केवळ मनोरंजन नव्हते; तर एकत्र बसणे, एकत्र हसणे आणि एकत्र प्रतिक्रिया देणे हा सामूहिक अनुभव होता. त्या काळात पाहण्याची प्रक्रिया व्यक्ती आणि समाज यांच्यात सहज संतुलन निर्माण करत असे. आजच्या वैयक्तिक स्क्रीन संस्कृतीत हे संतुलन हळूहळू धूसर होत चालले आहे. (Ott platforms the end of shared entertainment experiences)
मनोरंजन पूर्णपणे वैयक्तिक
आज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्मार्टफोनमुळे मनोरंजन पूर्णपणे वैयक्तिक झाले आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार, आपल्या वेळेनुसार कुठलाही कंटेंट पाहू शकते. या सुविधेमुळे मनोरंजन अधिक सुलभ झाले असले, तरी कौटुंबिक आणि सामूहिक अनुभवांमध्ये घट झाली आहे.
गाव आणि लहान शहरांमध्येही आता लोक स्वतःच्या स्क्रीनवर स्वतःच्या पसंतीनुसार मनोरंजन निवडतात. परिणामी, पारंपरिक सामूहिकतेची जागा वैयक्तिक अनुभवांनी घेतली आहे.
एक प्रसिद्ध विधान आहे — “माध्यमच संदेश असतो.”
या दृष्टीने पाहिले तर ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना थेट जागतिक कंटेंटपर्यंत पोहोचवतात — कोरियन ड्रामा, अमेरिकन वेबसीरिज, युरोपीय माहितीपट आणि भारतीय प्रादेशिक सामग्री सहज उपलब्ध होते. सांस्कृतिक वैविध्याच्या दृष्टीने ही समृद्ध गोष्ट असली, तरी पारंपरिक मनोरंजन आणि स्थानिक सांस्कृतिक पद्धतींवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसतो. (Ott platforms the end of shared entertainment experiences)
पूर्वी जे सामूहिक अनुभव एका घराच्या अंगणात सामायिक भावनांमधून तयार होत, ते आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या खाजगी जगात सीमित झाले आहेत.
उपभोगवादी संस्कृतीला चालना
ओटीटी प्लॅटफॉर्म उपभोगवादी संस्कृतीलाही चालना देतात. तरुण पिढी आपल्या पसंतीनुसार कंटेंट निवडते. त्यामुळे मनोरंजन हे केवळ पाहण्यापुरते न राहता ओळख, आवड आणि जीवनशैली व्यक्त करण्याचे माध्यम बनले आहे.
आधुनिक समाजात वैयक्तिकता आणि सामाजिक अंतर वाढत असल्याचे मानले जाते. ओटीटी हे अंतर आणखी वाढवतात, कारण लोक कौटुंबिक किंवा शेजारी संवादांऐवजी स्वतःच्या खोलीत आणि खासगी स्क्रीनमध्ये अधिक रमून जातात.
तरीही ओटीटीचा सकारात्मक पैलूही आहे. या माध्यमामुळे डिजिटल स्वरूपातील नवी सामूहिकता निर्माण होत आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन फोरम आणि कमेंट सेक्शनद्वारे लोक आपले अनुभव शेअर करतात आणि जागतिक समुदायाचा भाग बनतात.
ओटीटी प्लॅटफॉर्मचा द्वैती प्रभाव (Ott platforms the end of shared entertainment experiences)
सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रभाव द्वैती स्वरूपाचा आहे.(Ott platforms the end of shared entertainment experiences)
एका बाजूला ते ज्ञान, जागतिक दृष्टी आणि वैयक्तिक स्वातंत्र्य वाढवतात; तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक सामूहिक अनुभव, कौटुंबिक संवाद आणि स्थानिक सांस्कृतिक प्रथा कमकुवत करतात.
कस्टमायझेशन आणि प्रेक्षकांच्या आवडीनुसार सामग्री सुचवण्याची प्रणाली हे ओटीटीचे सर्वात मोठे आकर्षण बनले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पटकन चांगला कंटेंट पाहता येतो, अधिक प्रमाणात सामग्रीचा उपभोग घेता येतो आणि चित्रपट वा मालिकांचा अनुभव नव्या पद्धतीने घडतो.
आता साप्ताहिक भागांपुरते मनोरंजन मर्यादित राहिलेले नाही; रोजच्या किंवा दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिकांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, मनोरंजनाचा अखंड प्रवाह तयार झाला आहे. (Ott platforms the end of shared entertainment experiences)
एकंदरीत पाहता, ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजन अधिक वैयक्तिक, सहज आणि जागतिक बनवले आहे. ते प्रेक्षकांना त्यांच्या आवडी आणि जीवनशैलीनुसार अनुभव निवडण्याचे स्वातंत्र्य देतात. त्याच वेळी माध्यम उद्योग आणि संस्कृती उद्योगाच्या विस्तारालाही चालना देतात.
म्हणूनच ओटीटी हा केवळ तांत्रिक बदल नाही; तर समाजाच्या मनोरंजन, संस्कृती आणि वर्तनाला नव्याने आकार देणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
(लेखक अरुण कुमार गोंड हे अलाहाबाद विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात संशोधक आहेत. ग्रामीण समाजावरील सोशल मीडियाचा प्रभाव हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.)
(सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) `डाऊन टू अर्थ` वरून साभार)