नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगामामध्ये अतिरेकी हल्ल्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याने २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांच्या शोध घेण्यासाठी भारताच्या सर्व एजन्सीज कामाला लागल्या असून दहशतवाद्यांचे फोटो बाहेर आले आहेत. (Terrorists photo)
टाईम्स ऑफ इंडियाने हे फोटो प्रदर्शित केले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की टीव्ही रिपोर्टस् नुसार हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा फोटो आहेत. पीटीआय नुसार दहशतवाद्यांनी ‘मुसा’, ‘युनूस’ आणि ‘असिफ’ हे कोड नेम वापरले होते. (Terrorists photo)
या दहशतदवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून भारतातील सर्व राजकीय पक्षांनी घटनेचा निषेध करुन हल्लेखोरांना कडक शासन करण्याची मागणी केली आहे. काल मंगळवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ताबडतोब विमानाने काश्मीरला रवाना झाले. अजूनही त्यांचा काश्मीरमध्ये मुक्काम असून ते दहशतवादी कारवाईचा आढावा घेत आहेत. त्यांनी घटनास्थळी पहलगामला बुधवारी सकाळी भेट घेतली. (Terrorists photo)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते मंगळवारी मध्यरात्री भारतात परतले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ते सुरक्षेसंदर्भात आढावा घेत आहेत. सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :