नवी दिल्ली : तुम्ही महागड्या हँडबॅग, मनगटी घड्याळे, पादत्राणे आणि क्रीडापोशाख खरेदी करण्याचा विचार करताय का? तर मग तुमच्या खिशाला थोडी आणखी झळ सोसावी लागणार आहे. प्राप्तिकर विभागाने १० लाख रुपयांवरील वस्तूंसाठी १ टक्का टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स (टीसीएस) करआकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Luxury Goods)
फायनान्स ॲक्ट, २०२४ मध्येच प्राप्तिकर विभागाने याची तरतूद केली होती. २२ एप्रिल रोजी विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध केला आहे. महागड्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा माग ठेवता यावा, यासाठी विभागाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे, आता अशा वस्तू खरेदी करताना पॅन कार्डचे तपशील देणे बंधनकारक असणार आहे.
* प्रामुख्याने खालील वस्तूंची किंमत १० लाख रुपयांवर असल्यास टीसीएस आकारला जाईल. (Luxury Goods)
- ॲक्ससेरिज : मनगटी घड्याळे, गॉगल्स, बूट, हँडबॅग.
- शोभेच्या वस्तू : शिल्पे, कलाकुसरीच्या वस्तू, चित्रे.
- संग्राह्य वस्तू : नाणी, टपाल तिकीटे.
- दळणवळण साहित्ये : रोईंग बोट, कनू, हेलिकॉप्टर, याँट.
- क्रीडासाहित्य : गोल्फचे साहित्य, स्कीचे साहित्य.
- होम थिएटर सिस्टिम. शर्यतींसाठी आणि पोलो खेळासाठीचे घोडे.
हेही वाचा :
दहशतवाद, धर्म आणि राजकारण
आठवड्यापूर्वीच लग्न आणि…