प्रयागराज : आता हे सरकार लवकरच बदलण्यात येईल. त्यानंतर २६ फेब्रुवारीच्या आधी नवे सरकार स्थापन करण्यात येईल. अर्थात हे सरकार कोणत्या राज्याचे अथवा इतर कोणते नव्हे; तर ते आहे आखाड्याचे कामकाज चालवणारे सरकार. (KumbhMela)
महाकुंभमध्ये आखाड्यातील अंतर्गत व्यवस्था चालवणाऱ्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. आखाड्याचे कामकाज चालवणाऱ्या सरकारचा कार्यकाल महाकुंभ सुरू होण्याआधीच संपला आहे. आता हे कामकाज पंचायत व्यवस्थेच्या धर्तीवर सुरू आहे. आता याच माध्यमातून महाकुंभ संपेपर्यंत आखाड्याचे कामकाज सुरू राहील. महाकुंभ संपल्यानंतर म्हणजे, २६ फेब्रुवारीआधी आखाड्यांचे नवे सरकार निवडण्यात येईल. त्याचा कार्यकाळ पुढील सहा वर्षे असेल. (KumbhMela)
८ महंत आणि ८ उपमहंतांची निवड
या परंपरेनुसार, सात आखाड्यांचे नागा साधू, महामंडलेश्वरांसह हजारो सदस्य आहेत. सर्व अध्यात्मिक व्याप सांभाळण्याचे काम ८ महंत आणि ८ उपमहंत करतात. या ८ महंत आणि ८ उपमहंतांची निवड करण्यात येईल. १६ जणांची समिती सचिवांसह अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. आठ महंत आखाड्यांचे सर्व कामकाज आणि आर्थिक व्यवस्थापन आणि हिशेबही ठेवतात.
साधू-संन्यासीवर कारवाईच अधिकार
आखाड्यातील महत्त्वाचे निर्णय पंच घेतात. म्हणून पंचायती आखाडा, महानिर्वाणी आखाडा, श्रीशंभू पंचायती अटल आखाडा, तपोनिधी पंचायती श्रीनिरंजनी आखाडा, पंचायती आखाडा आनंद यांच्या नावाच्या आधी पंचायती हा शब्द जोडलेला आहे. आखाड्याच्या परंपरेनुसार, सर्व सहमतीने निर्णय घेण्याची परंपरा आहे. सर्व कामकाज आणि निर्णय पारदर्शी पद्धतीने घेतले जातात. विशेषत: एखाद्या संन्याश्याविरोधात काही तक्रार आली असेल तर त्याच्यावरील कारवाईही पंचायतच करते. (KumbhMela)
हेही वाचा :
शाही स्नान आणि प्रमुख दिवस