दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२४ मधील सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू म्हणून भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची निवड केली आहे. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची मिली केर ही सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटू ठरली आहे. (Arshdeep)
अर्शदीपसाठी २०२४ हे वर्ष लाभदायी ठरले. या वर्षी त्याने १८ टी-२० सामन्यांमध्ये ३६ विकेट घेतल्या. भारताने २०२४ मध्ये तब्बल सतरा वर्षांनी टी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावण्यामध्येही २५ वर्षीय अर्शदीपची महत्त्वाची भूमिका होती. या वर्ल्ड कपमध्ये त्याने १७ विकेट घेतल्या होत्या. स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो संयुक्तरीत्या अग्रस्थानी होता. अंतिम सामन्यातही त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० धावांत २ विकेट घेतल्या. (Arshdeep)
सध्या सुरू असणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२०मध्ये अर्शदीपने २ विकेट घेण्याबरोबरच कारकिर्दीतील ९७वी टी-२० विकेट घेतली. तो आता भारताचा टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. शनिवारीच आयसीसीने जाहीर केलेल्या २०२४ च्या जागतिक टी-२० संघामध्येही अर्शदीपचा समावेश करण्यात आला होता. अर्शदीपसोबत २०२४ च्या सर्वोत्कृष्ट टी-२०पटूसाठी सिकंदर रझा, ट्रॅव्हिस हेड, बाबर आझम यांना नामांकन होते. त्यापैकी, अर्शदीपने बाजी मारली. अर्शदीपच्या रूपाने सलग तिसऱ्या वर्षी या पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. यापूर्वी, २०२२ आणि २०२३ मध्ये सूर्यकुमार यादव आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू ठरला होता. (Arshdeep)
महिला टी-२०मध्ये मिली केरने २०२४ साली ३८७ धावा, २९ विकेट आणि ११ झेल घेतले होते. २०२४ मध्ये न्यूझीलंडला टी-२० वर्ल्ड कपचे पहिलेवहिले विजेतेपद मिळवून देण्यात २४ वर्षीय केरचा महत्त्वाचा सहभाग होता. या स्पर्धेची ती सर्वोत्कृष्ट खेळाडूही ठरली होती. (Arshdeep)
From rising talent to match-winner, Arshdeep Singh excelled in 2024 to win the ICC Men’s T20I Cricketer of the Year award
pic.twitter.com/iIlckFRBxa
— ICC (@ICC) January 25, 2025
हेही वाचा :