महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पक्ष विरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. उद्या (रविवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौऱ्यावर असून उद्याच सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्याआधी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. (Sulbha Khodke)
काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची अजित पवार आणि बाकी आमदार खासदारांनी शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटासोबत जास्त सलगी वाढल्याच्या चर्चा आहेत. विविध विकासकामांसाठी निधी, शासन स्तरावर प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी अजित पवारांची मदत घेतली आहे.
राज्यसभा, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांवर ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.त्यामध्ये सुलभा खोडके यांचे देखील नाव असल्याची चर्चा होती, तर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ज्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवला होता त्यांना विधानसभेची उमेदवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभा खोडकेंचं नाव होतं. त्यामुळे त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारादरम्यान त्या कुठे दिसल्या नाहीत. एकंदरीत आमदार खोडके यांनी अजित पवार पक्षाची वाट धरल्याच्या चर्चा सुरू होत्या. (Sulbha Khodke)
हेही वाचा :