इस्लामाबाद : पाकिस्तानात लष्करी ताफ्याला लक्ष्य करून आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १६ सैनिक ठार झाले आहे. तसेच १९ जण जखमी झाले असून, त्यात काही स्थानिक नागरिकांचाही समावेश असल्याचे स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी सांगितले. (Suicide attack in Pak)
शनिवारी वायव्य पाकिस्तानमध्ये ही घटना घडली.
‘‘एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवले. या स्फोटात १६ सैनिक ठार झाले, १० लष्करी कर्मचारी आणि १९ नागरिक जखमी झाले,’’ असे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील एका स्थानिक सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. माध्यमांशी थेट बोलण्याचा अधिकार नसल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या वृत्ताला या अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
‘‘स्फोटात दोन घरांचेही नुकसान झाले आहे. त्यात सहा मुले जखमी झाली आहे,’’ असे येथील एका पोलिस अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले. (Suicide attack in Pak)
हा हल्ला पाकिस्तान तालिबानच्या एका गटातील हाफिज गुल बहादूर सशस्त्र गटाच्या आत्मघातकी बॉम्बर विंगने केला होता.
२०२१ मध्ये काबूलमध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून पाकिस्तानच्या अफगाणिस्तान सीमेवरील भागात हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानने आपल्या पश्चिमेकडील शेजारी देशावर पाकिस्तानविरुद्ध हल्ल्यांसाठी त्यांच्या भूमीचा वापर करण्यास परवानगी दिल्याचा आरोप केला आहे, तथापि हा दावा तालिबानने फेटाळला आहे. (Suicide attack in Pak) एएफपीच्या आकडेवारीनुसार, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सरकारशी लढणाऱ्या सशस्त्र गटांनी वर्षाच्या सुरुवातीपासून केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २९० लोक त्यात बहुतेक सुरक्षा अधिकारी, मारले गेले आहेत.
हेही वाचा :
सायबर भामट्यांचा निवृत्त अभियंताला ७.८६ कोटींचा गंडा
‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाल यांचे निधन