नवी दिल्ली : हॅलो, मी अंतराळात पोहोचलोय! किंवा हॅलो, मी अंतराळातून बोलतोय, असा कॉल आपल्याला नजीकच्या काळात येणे शक्य आहे. कारण अवकाश पर्यटनाची नवनवी दारे खुली होत आहेत. त्याबरोबच संपर्काचे नवतंत्रज्ञान झपाट्याने विकसीत होत आहे. स्मार्ट फोन यंत्रणाही अधिक गतिमान होत आहे. त्यामुळेच थेट अंतराळातून स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. यात भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. (Space Tourism)
यावर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात इस्रो अमेरिकन कम्युनिकेशन सॅटेलाइट लाँच करणार आहे. त्यामुळे अंतराळातून थेट मोबाईलवर संपर्क साधता येणार आहे. हे पूर्णपणे व्यावसायिक लाँचिंग असणार आहे. इस्रोचीच न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ही विंग ते करणार आहे. सध्या अंतराळातून इंटरनेट आणि व्हाईस कॉलसाठी स्पेशल हॅण्डसेट किंवा स्पेशल टर्मिनलची व्यवस्था करावल लागते.
सूत्रांच्या माहितीनुसार, टेक्सास येथील एएसटी (AST) ही कंपनी स्पेसमोबाइलसाठी सॅटेलाइट लाँच करणार आहे. एखादी अमेरिकन कंपनी भारताच्या माध्यमातून एवढा मोठा सॅटेलाइट लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने या आधी अमेरिकन कंपन्यांचे छोटे सॅटेलाइट्स याआधी लाँच केले आहेत. (Space Tourism)
एएसटी स्पेसमोबाइलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एबेल एवेलन यांनी गेल्या वर्षी ‘ब्लूबर्ड’ च्या ‘ब्लॉक २ सॅटेलाइट’चे जियो-सिंक्रोनाइज सॅटेलाइट लाँच व्हेइकलच्या (GSLV) माध्यमातून लाँचिंग करण्याची घोषणा केली होती.
अंतराळातून स्मार्टफोनपर्यंत सेल्युलर ब्रॉडब्रँड (मोबाइल फोन नेटवर्क) कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ब्लूबर्ड सॅटेलाइट डिझाइन करण्यात आला आहे.
हा कंपनीच्या स्पेसमोबाइल कम्युनिकेशन सिस्टमचा भाग असणार आहे. एक ब्लूबर्ड सॅटेलाइटमध्ये ६४ स्कायर मीटर म्हणजे फुटबॉलच्या अर्ध्या मैदानाच्या आकाराचा विशाल अँटेना असणार आहे. (Space Tourism)
हेही वाचा :