व्हिएन्ना : ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहरात एका शाळेत झालेल्या गोळीबारात किमान दहाजणांचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत, तपास सुरू आहे. (Shooting at School)
ऑस्ट्रियन सार्वजनिक प्रसारक ‘ओआरएफ’च्या म्हणण्यानुसार, गोळीबार करणारा संशयित विद्यार्थीच असल्याचे मानले जाते. गोळीबारानंतर त्याने शाळेच्या शौचालयात जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
शहराच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या वायव्य ग्राझमधील बोर्ग ड्रेयर्सचुत्झेंगासे शाळेत ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की त्यांना सकाळी १० वाजता (स्थानिक वेळेनुसार) सतर्क करण्यात आले आणि त्यानंतर शाळेच्या इमारतीत गोळीबाराचे आवाज ऐकू आले. (Shooting at School)
पोलिस प्रवक्ते साबरी योर्गुन यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतल्याचे पोलिस प्रवक्ते साबरी योर्गुन यांनी केली.
अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांची संख्या अधिकृतपणे जाहीर केली नसली तरी, ‘ओआरएफ’ने स्थानिक वृत्तपत्रांचा हवाला देत म्हटले आहे की पाच जण ठार झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. ग्राझचे महापौर एल्के काहर यांच्या मते, मृतांमध्ये गोळीबार करणाराही आहे.
बीबीसीनुसार, जखमी विद्यार्थ्यांवर शाळेजवळील कार्यक्रम स्थळ असलेल्या हेल्मुट लिस्ट हॉलमध्ये उपचार सुरू आहेत.
ओआरएफने पोलिस प्रवक्ते फ्रिट्झ ग्रुंडनिग यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांत मृत्यूचा आकडा वाढू शकतो, असे म्हटले आहे. दक्षता म्हणून पोलिस हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. (Shooting at School)
ऑस्ट्रियन पोलिसांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ड्रेयर्सचुत्झेंगासेवरील फेडरल उच्च माध्यमिक शाळेत गोळीबार झाला आहे. नागरिकांनी या परिसरापासून दूर राहण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
पोलिसांनी नंतर सोशल नेटवर्क X वर लिहिले की शाळा रिकामी करण्यात आली आहे आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. आता कोणताही धोका नसल्याचे मानले जात आहे.
ऑस्ट्रियातील दुसरे सर्वात मोठे शहर ग्राझ हे देशाच्या आग्नेयेस स्थित आहे आणि येथे सुमारे तीन लाख रहिवासी आहेत.
हेही वाचा :
आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल : पवार
लोकसभा उपाध्यक्ष निवडीसाठी मोदींकडे काँग्रेसचा आग्रह