मुंबई : विशेष प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील घटक पक्ष आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावत आहेत. (Shivsena urgent meeting)
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यासंदर्भात राज्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची संवाद साधत तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. हा अंदाज घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढायच्या की एकत्रित लढायचा, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Shivsena urgent meeting)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ जुलै) शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक होणार आहे. ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान मुक्तागिरी बंगला इथे रात्री नऊ वाजता होणार आहे. (Shivsena urgent meeting)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने करावयाची तयारी याचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. सर्व मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. या जबाबदाऱ्यांसंबंधीचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार आहे. आगामी स्थानि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, ही बैठक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते. मंत्र्यांच्या कामगिरीचा आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचा सखोल आढावा या बैठकीत घेतला जाईल. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी आणि रणनीती निश्चित केली जाईल. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
सरकार भिकारी; कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त विधान!
वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला