राधानगरी : भुदरगड विधानसभेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत हॅटट्रिक केली आहे. या मतदारसंघातून हॅटट्रिक करणारे आबिटकर पहिले आमदार ठरले आहेत. यावेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकरांनी प्रारंभापासूनचे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवले. परिणामी तालुक्यात दोनदा निवडून आलेला आमदार तिसऱ्यांदा निवडून येत नाही या शक्यतेला आबिटकरांनी सुरुंग लावला. गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे याही वेळी ३८,५७२ मताधिक्याने विजय मिळविला आहे. गेली दहा वर्षे केलेली कामे, तरुण चेहरा, युवावर्गाचा पाठिंबा, कामाची तत्परता, मतदारसंघातील जनसंपर्क व वाड्या-वस्त्यांपर्यंत असलेला वावर या आबिटकरांच्या जमेच्या बाजू होत्या. (Prakash Abitkar)
Shivsema
कोल्हापूर; प्रतिनिधी : शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रात्रीचे पब सुरू करण्याची योजना मांडली. या योजनुमळे तरुणाईला वाईट सवय लागली. युवती, महिला असुरक्षित झाल्या आहेत, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. महायुतीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट कार्डवर आदित्य ठाकरे यांनी डिपोर्ट कार्ड अशी टीका केली होती. या संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. महायुतीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट कार्ड संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Rajesh Kshirsagar)
विरोधक महायुतीच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगून राजेश क्षीरसागर म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदलणार, अल्पसंख्याक असुरक्षित असा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला. त्यांचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाला. पण हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत असफल झाला. हरियाणात भाजपची सत्ता आली तर जम्मू काश्मिरमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. महाराष्ट्रात विरोधक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यात यापूर्वी कधीही झाली नाही अशी प्रगती महायुतीने सव्वा दोन वर्षांत केली आहे, असा त्यांनी दावा क्षीरसागर यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळापेक्षा महायुतीने प्रचंड वेगाने प्रगती केली आहे. लाडक्या बहीणसारख्या कल्याणकारी योजनामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करताना महायुती सरकारने राज्याची तिजोरीही बळकट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हेही महाराष्ट्राला मदत करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
क्षीरसागर म्हणाले, राज्यात आठ लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आल्याने देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य झाले आहे. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची संधी दिली आहे. महिलांना एसटीच्या तिकिट दरात ५० टक्के सवलत तर ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सोय यांसह गरिबांना घरे, आदीवासींसाठी घरकुल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रोजगार मेळावा, युवकांसाठी योजना, शहरी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, सांस्कृतिक वारसा, क्रीडासंबधी महायुतीने अनेक कामे केली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Rajesh Kshirsagar)
हेही वाचा :