मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुःखद निधन झाले. या अपघातात त्यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार प्रवास करत असलेल्या लियरजेट-45 XR या विमानात कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांच्यातील शांभवी पाठक ही को – पायलट म्हणून या विमानाचे सारथ्य करत होती. शांभवीला १५०० तासांच्या फ्लाईट सेवेचा अनुभव होता. तर, तिच्यासह असणाऱ्या कॅप्टन सुमित कुमार यांना १६ हजार तासांचा अनुभव होता. मात्र, या दोघांचाही अनुभव यावेळी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवार यांच्या विमानाचे सारथ्य करणारी को पायलट शांभवी पाठक हिने २०२० ते २०२२ या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन एयरोस्पेस साइंस आणि टेक्नोलॉजी मध्ये बीएससी पदवी घेतली होती. त्याआधी शांभवीने २०१८-२०१९ मध्ये न्यूझीलंड इंटरनॅशनल कर्मशिअल पायलट अकॅडमीतून एका वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केला होता. तर, २०२२ पासून व्हीएसआर व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावर त्या कार्यरत होती. याच कंपनीच्या माध्यमातून ती पायलट म्हणून सेवा देत होती. शांभवी हिला एव्हिएशन सेक्युरिटी स्पाईसजेटकडून परवाना देण्यात आला होता, मार्च २०२२ मध्ये हा परवाना इश्यू करण्यात आला होता. याबाबतची माहिती शांभवीच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून प्राप्त झाली आहे. शांभवीने आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले होते. तिचे वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत होते. (Who are the four people who died in the plane crash)
विदीप जाधव हे आई, वडील, पत्नी, ठाणे पोलीस स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकणारा मुलगा अध्द्वीक आणि सातवीत शिकणारी मुलगी नेत्रा यांच्या समवेत ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातील विटावा, सूर्यनगरमधील कृष्णविहार इमारतीमध्ये राहत होते. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव हे विदीप यांचे मुळगाव होते. तर मागील २० ते २२ वर्षांपासून ते विटावा येथे वास्तव्यास होते. आई, वडील, दोन मुले, पत्नी, दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. कामानिमित्ताने मुंबापुरी गाठलेले विदीप हे २००९ च्या बॅचमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले होते. नायगाव पोलीस ठाण्यानंतर विदीप व्हीआयपी विशेष सुरक्षा सेवेत झाले. यापुर्वी ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात होते तर मागील काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष अंगरक्षक म्हणून विदीप जाधव कार्यरत होते. अत्यंत विश्वासू असणारे विदीप हे बुधबारी (ता.२८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ते विमानामधून बसून बारामतीच्या दिशेने रवाना झाले. विमानामध्ये बसल्यानंतर अजित पवार यांच्यासोबतचा त्यांचा फोटो त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठवला होता. विदीप यांचे वडील दिलीप जाधव हे एका शाळेत क्लार्क म्हणून काम करत होते. (Who are the four people who died in the plane crash)
पिंकी माळी ही उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तहसीलमधील भैसा गावची रहिवासी आहे. ती विवाहित असून तिचे कुटुंबीय मुंबईत वास्तव्याला आहेत. पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. अपघाताच्यावेळी ती विमानात क्रु मेंबर म्हणून कार्यरत होती. गेली पाच वर्षे ती क्रु मेंबर म्हणून काम करत होती. या आधी अजित पवारासोबत तीन वेळा प्रवास केला आहे. प्रायव्हेट विमानात ती नेहमी राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांच्यासोबत क्रु मेंबर म्हणून प्रवास करायची. (Who are the four people who died in the plane crash)