मुंबई : प्रतिनिधी : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या समरजीत घाटगे यांची आता भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. मुंबईत भाजपच्या मुख्यालयात आज बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Samarjeetsinh Ghatge returns to the BJP)
समरजीत घाटगे यांनी यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांना सोडण्यात आली. भाजपने समरजीत घाटगे यांना वाऱ्यावर सोडल्याने त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण या निवडणुकीत मुश्रीफांकडून त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कट्टर वैरी असलेले हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र झाले. दोघांनी कागल नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकावला. जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीतही समरजीत घाटगे यांनी भाजपचा प्रचार केला. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशची औपचारिकता बाकी होती. आज बुधवारी घाटगे यांनी पन्हा हातात कमळ घेतले. (Samarjeetsinh Ghatge returns to the BJP)
पक्षप्रवेशानंतर बोलताना त्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यकर्त्यांना संबोधन करताना ते म्हणाले, आता तुमच्या सगळ्यांचे ऐकून सर्व प्रयोग झाले आहेत. आता प्रयोगला स्कोप राहिला नाही. आता आपण भाजपमध्ये आला आहोत. (Samarjeetsinh Ghatge returns to the BJP)