कोलकात्ता : सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्तीला यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने त्यांना धमकी दिली असून १५ दिवसांत माफी मागावी, अन्यथा पश्चाताप करावा लागेल, असे म्हटले आहे. भाटी याने दुबईतून दोन व्हिडीओ जारी केले आहेत. या व्हिडीओंमध्ये तो मिथुन चक्रवर्ती यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. (Mithun Chakraborty)
Salman Khan
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या १८ व्या पर्वाची सुरुवात आता आहे. अभिनेता सलमान खान याचे सूत्रसंचालन करत आहे. गेल्या दीड दशकांपासून सलमान हा टेलिव्हिजनच्या या वादग्रस्त शोचा चेहरा बनला आहे. खरंतर त्याच्या सूत्रसंचालनाची प्रेक्षकांना इतकी सवय झाली आहे की आता त्याला रिप्लेस करणं कठीण झालं आहे.परिणामी, त्याच्यासाठी बिग बाँस प्रचंड खर्च करत आहे. (Big Boss Hindi)
सध्या प्रेक्षकांमध्ये बिग बॉसच्या नव्या पर्वात कोणत्या स्पर्धकाची एन्ट्री झाली ? कोण कसं खेळतंय ? कुणी किती मानधन घेतलं ? याची जोरदार चर्चा सुरू असून याचे सूत्रसंचालन करणारा सलमान खान बिग बाँस च्या शो साठी महिन्याकाठी तसेच संपूर्ण शो साठी किती रुपये मानधन घेतले हा औत्सुक्याचा विषय ठरत आहे.
सहा ऑक्टोबर पासून कलर्स टीव्हीवर बिग बॉस हा शो प्रसारित होत असून शंभर दिवसांचा हा प्रवास आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक व प्रेक्षकांचा मधला दुवा म्हणून सलमान खान हा सर्वात जास्त मानधन घेणारा चेहरा आहे. मनोरंजन सृष्टीतील एका अहवालानुसार,सलमान खान एका महिन्यासाठी ६० कोटी रुपयांचा मानधन घेणार आहे. महिन्याचे एवढे मानधन सलमान खानला या संपूर्ण सीझनसाठी म्हणजेच १५ आठवड्यांसाठी मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.हा सीझन मागील सीजन प्रमाणे १५ आठवड्यात चालला तर अभिनेता सलमान खानला जवळपास 250 कोटी रुपये मिळू शकतात . (Big Boss Hindi)
सलमानने १५ वर्षांपूर्वी बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा प्रति फिल्म ₹ ५ ते ₹ १० कोटींच्या दरम्यान कमाई करत होता. आज तो एका चित्रपटासाठी तब्बल ₹ १५० कोटी कमवू शकतो. सामान्य बिग बॉस सीझन त्याच्या कॅलेंडर वर्षाचा एक तृतीयांश भाग घेते हे लक्षात घेता, स्टार येथे समान शुल्काची मागणी करतो.
हेही वाचा :