नैसर्गिक चमक वाढवण्याबरोबरच त्वचेची कांती सुधारण्यासाठी केशर महत्त्वाचे ठरते. त्याचे आरोग्यविषयक फायदेही आहेत. त्याचा स्वयंपाकातील वापरही आरोग्यदायची आहे. विशेष म्हणजे ते सौंदर्य वाढवणारे आहे.
सौंदर्याची व्याख्या प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. सुंदर दिसण्यावर प्रत्येकाचा भर असतो. त्यासाठी नानाविध उपाय केले जातात. परंतु, नैसर्गिक पदार्थांचा वापर कधीही अपायकारक असत नाही. उलट ते फायदेशीरच असतात. त्यांपैकीच एक केशर. किमती मसाला अशी त्याची ओळख. त्याचे आरोग्यविषयक फायदे, स्वयंपाकातील वापर आणि विशेष म्हणजे ते सौंदर्य वाढवणारे आहे. दूध आणि केशर एकत्र केल्यास त्यातून एक शक्तिशाली अमृत तयार होते. ते नियमीत घेतल्याने त्वचा आणि एकूणच सौंदर्य उजळते. त्यामुळेच दैनंदिन आहारात केसर दुधाला स्थान असणं कधीही फायदेशीर ठरते.
नैसर्गिक चमक वाढवणारा, त्वचेची कांती सुधारणारा आणि तेजस्वी चमक देणारा केशर म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. अँटिऑक्सिडंट्स म्हणून ते समृद्ध आहे. वयोमानपरत्वे त्वचा निस्तेज होते, ते रोखण्याबरोबरच रॅडिकल्सला प्रतिबंध करण्यासही केशर मदत करते. म्हणूनच केशरयुक्त दूध नियमीत पिण्यामुळे किंवा ते नियमीत लावल्याने त्वचा उजळते, ती चमकदार आणि ताजेतवानी दिसते.
काळे डाग घालवते
सर्वसाधारणपणे हायपरपिग्मेंटेशन आणि काळे डाग अशा समस्या नेहमी जाणवतात. सूर्यप्रकाशामुळे, हार्मोनल बदलांमुळे किंवा वृद्धत्वामुळे या समस्या उद्भवणे साहजिकच आहे. केशरमध्ये त्वचा उजळवणारे, चमकदार करणारे नैसर्गिक गुणधर्म असतात. त्यामुळे या समस्यांवर मात करता येते. लॅक्टिक अॅसिड हा त्वचेसाठी महत्त्वाचा घटक आहे. केशर आणि दुधाच्या एकत्रिकरणामुळे ते भरपूर प्रमाणात मिळते. त्याच्या सेवनामुळे मृत त्वचा निघून जाते. त्यामुळे त्वचा चमकदार होते.
तारुण्यवर्धक
केशर कॅरोटीनॉइड्सने समृद्ध आहे. त्यात क्रोसिनचाही समावेश आहे. त्यामुळे पेशींची वाढ होते, कोलेजन तयार होते. केशर दुधाचे नियमित सेवन केल्याने त्वचेचे आतून भरणपोषण होते. त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात. याशिवाय, त्वचा मुलायम आणि निरोगी होण्यासाठी केसर दुधाचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे त्वचा तरुण आणि तजेलदार राहते.
बॅक्टेरियावाढीस प्रतिबंध
त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे मुरुम आणि डाग घालवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्वचेचा रखरखीतपणा कमी करता येतो. कोरडेपणा त्वचेला शांत करते, लालसरपणा कमी करते आणि मुरुम आणि डाग बरे करण्यास मदत करते. केसर-मिश्रित दुधात मधाचे काही थेंब मिसळल्याने चांगला फेस पॅक तयार होतो. डाग बरे होतात.
त्वचेचे पोषण
थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी, रखरखीत राहते. त्यामुळे चीडचीड होते. या दिवसांत मॉइश्चरायझर वापरावे लागते. केशरयुक्त दूध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे हायड्रेशन होते आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. दुधातील लॅक्टिक अॅसिड हळूवारपणे बाहेर पडते, तर केशर त्वचा मऊ आणि लवचिक राहण्यासाठी मदत करते.
उन्हात काम केल्यामुळे टॅनिंग, अकाली वृद्धत्व आणि सनबर्न होऊ शकते. केशरमधील नैसर्गिक संयुगांमुळे अतिनील किरणांमुळे त्वचेची हानी भरून काढतात. आहारात किंवा स्किनकेअर रूटीनमध्ये केशरयुक्त दुधाचा समावेश केल्याने उन्हामुळे खराब झालेली त्वचा चांगली होण्यास मदत होते, शिवाय भविष्यातील हानीही टाळता येते.
केसांचे आरोग्य
केशर दुधाचे फायदे फक्त स्किनकेअरपुरते मर्यादित नाहीत; तर केसांच्या आरोग्यासाठीही ते वरदान आहे. केशरचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांचे आरोग्य सुधारतात. केस गळणे कमी करतात. त्यांच्या निरोगी वाढीला मदत करतात. केसांना केशर दुधाची मालिश केल्याने डोक्यातील कोंडा दूर होतो, रक्ताभिसरण सुधाते आणि केसांना नैसर्गिक चमक येते. त्यामुळे आपोआपच सौंदर्य खुलते.