बेंगळुरू : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने हवालाद्वारे पैसे पाठवल्याची कबुली दिली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) वकील मधु राव यांनी मंगळवारी सत्र न्यायालयाला ही माहिती दिली. सोने तस्करी प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्री रान्या राव हिच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान राव हिने दिलेल्या कबुलीबद्दल न्यायालयासमोर स्पष्ट केले. (Ranya Rao)
डीआरआयने उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या आधारे विशेष न्यायालयाने तिचा जामीन नाकारल्यानंतर रान्या राव हिने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
रान्या ही डीजीपी-रँकचे अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. गेल्या आठवड्यात बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) डीआरआय अधिकाऱ्यांनी तिला पकडले होते. विमानतळावर एका कॉन्स्टेबलने तिला बाहेर काढले होते. तिची तपासणी केली असताना तिच्याकडे १४.२ किलो सोने सापडले. (Ranya Rao)
या प्रकरणाबाबत अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांनी दिलेल्या चौकशी अहवालाबद्दल विचारले असता, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की त्यांना त्याबद्दलची स्थिती माहिती नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अंतरिम अहवाल सादर करण्यात आला आहे की नाही याबद्दलही त्यांना माहिती नाही. “आम्ही त्यांच्याशी (गुप्ता) दररोज चौकशीबाबत चर्चा करत नाही. त्यांना एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. अहवाल सादर झाल्यानंतरच आम्हाला सर्व काही स्पष्ट होईल,” असे ते म्हणाले. (Ranya Rao) रान्या राव रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. संबंधित कथित सोन्याच्या तस्करीत रामचंद्र राव यांच्या संभाव्य सहभागाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने गुप्ता यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा :