कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरकरच्या जामिनावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. फिर्यादी आणि बचाव पक्षांकडून युक्तीवाद झाल्यानंतर पुढील सुनावणी बुधवारी (दि ९) होणार असल्याने कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जात इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा अपमानजनक उल्लेख करुन प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी सावंत यांच्या वकीलांनी कोरटकरला अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे. (Notice of defamation)
कोरटकरला अब्रुनुकसानीची नोटीस
कोरटकर याच्या जामीन अर्जात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा अपमानजनक उल्लेख करून प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी सावंत यांच्या वकिलांनी कोरटकरला अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. कळंबा कारागृहातील अधिकारी अविनाश भोई यांच्यामार्फत सोमवारी अंडासेलमध्ये त्याला नोटीस देण्यात आली. (Notice of defamation)
कोरटकरने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आणि जिल्हा न्यायालयात केलेल्या जामीन अर्जांमध्ये सावंत यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली. सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला. त्यांच्यावर जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना पोलिसांकडून अटक झाली होती, असा उल्लेख त्याच्या जामीन अर्जात केला आहे. सावंत यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार असल्याने त्याला ॲड. योगेश सावंत यांच्यामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याचे सावंत यांचे वकील सरोदे यांनी सांगितले. तसेच त्याने कोणाच्या सांगण्यावरून सावंत यांच्याबद्दल अपमानजनक माहिती लिहिली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. (Notice of defamation)
फिर्यादी आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद
जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर कोरटकरच्या जामिनावर सुनावणी झाली. कोरटकरचे वकील सौरभ घाग सुनावणीसाठी ऑनलाईनवर उपस्थित होते. कोरटकरांना जामिन मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. त्यांनी तपासात सहकार्य केला आहे. त्यांनी मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे. त्यांची पोलिस कोठडीही संपली असल्याचे घाग यांनी सांगितले. (Notice of defamation)
सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी कोरटकर यांच्या गुन्हाचा तपास पोलिस करत असून त्याला जामीन मिळाला तर तो पुरावा नष्ट करु शकतो. जामिनदारावर दबाव आणू शकतो असा युक्तीवाद केला. गुन्हा घडल्यानंतर तो तेलंगणाला पळून गेला होता. जामिन मिळाल्यानंतर तो पुन्हा पळून जाऊ शकतो याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. (Notice of defamation)
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरादे यांनी या गुन्ह्याचा पोलिस अजूनही तपास करत असून तो पर्यंत त्याला जामीन मिळू नये अशी मागणी केली. कोरटकरवर यापूर्वी दोन हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे तो कारागृहातच सुरक्षित राहू शकतो असा युक्तीवाद करताच बचाव पक्षाचे वकील सौरभ घाग यांनी आक्षेप घेतला. जामिन मिळवणे हा त्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे घाग यांनी सांगितले. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्याच न्यायाधीश कश्यप यांनी सांगितले. (Notice of defamation)
हेही वाचा :