मुंबई; विशेष प्रतिनिधी : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना आज (दि.२१) नायगाव पोलीस मुख्यालय येथील स्मृतिस्तंभावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. गेल्या वर्षभरात देशात ३९ पोलीस अधिकारी व १७७ पोलीस अमलदार शहीद झाले आहेत. (Police Memorial Day)
यावेळी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनी देखील पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. (Police Memorial Day)
शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचून दाखविल्यानंतर पोलीस बँड पथकाद्वारे सलामी शस्त्र धून वाजविण्यात आली. यावेळी अधिकारी व जवानांनी सलामी दिली तसेच पोलिसांतर्फे अभिवादन रूपात बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. राज्यपालांनी निमंत्रित देश-विदेशी पाहुणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी व हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
हेही वाचा :