नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे. या हल्ल्यातील पिडितांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. (Man ki baat)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १२१ व्या भागात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. हल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी निषेध व्यक्त करत दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी २५ एप्रिल रोजी निधन झालेले इस्रोचे माजी शास्त्रज्ञ कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांनाही शोक व्यक्त केला. त्यांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यानंतर हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारताने म्यानमारला दिलेल्या मदतीवर प्रकाश टाकला. (Man ki baat)
हा हल्ला दहशतवादी आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या हताशपणाचे आणि भ्याडपणाचे प्रतिबिंब असल्याचे ते म्हणाले. काश्मीरमधील शांतता आणि प्रगती खंडित करणे हा त्यांचा उद्देश आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, देशाचे शत्रू या प्रदेशातील वाढती शांतता, पर्यटन, लोकशाही आणि तरुणांसाठी संधी सहन करू शकत नाहीत. “दहशतवादाविरुद्धच्या युद्धात १४० कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. (Man ki baat)
पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ मध्ये म्हणाले, दहशतवादी हल्ल्याने माझ्या मनात खूप वेदना झाल्या आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक नागरिकाचे मन दुखावले आहे. प्रत्येक भारतीयाला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती तीव्र सहानुभूती आहे. (Man ki baat)
या हल्ल्यानंतर जगातील प्रमुख नेत्यांनी मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत, संदेश पाठवले आहेत. सर्वांनी या भयानक दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. मी पीडितांच्या कुटुंबियांना खात्री देतो की त्यांना न्याय मिळेल. या हल्ल्यातील कट रचणाऱ्यांना आणि गुन्हेगारांना कठोर उत्तर दिले जाईल, असा इशाराही मोदी यांनी दिला. (Man ki baat)
मोदी म्हणाले, दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीय संतापाने पेटला आहे. पहलगाममधील हा हल्ला दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांची निराशा दर्शवितो. काश्मीरमध्ये शांतता परतत असताना जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना ते आवडले नाही. दहशतवादी आणि त्यांचे मालक काश्मीर पुन्हा एकदा उद्ध्वस्त करू इच्छितात. म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात, राष्ट्राची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. या आव्हानाला तोंड देण्याचा आपला निर्धार आपण बळकट केला पाहिजे. (Man ki baat)
दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांविरुद्धच्या निर्णायक लढाईत १४० कोटी भारतीयांमध्ये एकता हे सर्वात मोठे शस्त्र आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल, न्याय निश्चितच मिळेल,असे आश्वासनही यांनी दिले. (Man ki baat)
हेही वाचा :