काठमांडू : कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे जगभरात पेट्रोल स्वस्त झाले आहे. नेपाळमध्येही भारताच्या तुलनेत पेट्रोलचे सरासरी दर स्वस्त आहेत. भारताच्या तुलनेत श्रीलंका वगळता शेजारील देशांमध्ये भूतान, बांगला देश, चीन, पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये प्रति लिटर ३७ रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. कारण, ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा ७० डॉलर प्रतिपिंपाच्या जवळ आले आहे. दुसरीकडे, डबल्यूटीआय क्रूड ७० डॉलरच्या खाली आहे. (Petrol Price)
पाकिस्तानमध्ये पेट्रोल २६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. ‘ग्लोबल पेट्रोल प्राईसेस. कॉम’ वर प्रसिद्ध झालेल्या १४ ऑक्टोबरच्या किंमत सूचीनुसार, भारतात पेट्रोलची सरासरी किंमत १००.९७ रुपये प्रति लिटर आहे, तर पाकिस्तानमध्ये ते ७४.७५ रुपये प्रति लिटर आहे. नेपाळमध्ये पेट्रोल ९८.७५ रुपये प्रति लिटर आणि चीनमध्ये ९४.९६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बांगला देशात एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त ८५.०९ रुपये प्रति लिटर आहे. म्हणजे भारतापेक्षा सुमारे १५ रुपये स्वस्त. म्यानमारमध्ये ते आणखी स्वस्त आहे. येथे पेट्रोलचा दर ८३.७० रुपये आहे. भारताच्या तुलनेत भूतानमध्ये पेट्रोल ३७ रुपयांनी स्वस्त आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये श्रीलंका हा एकमेव देश आहे जिथे पेट्रोल भारतापेक्षा महाग आहे. येथे पेट्रोलचा दर १०८.०६ रुपये प्रतिलिटर आहे. (Petrol Price)
रशिया-युक्रेन युद्धात कच्च्या तेलाची किंमत १३० डॉलर प्रतिपिंपावर पोहोचली होती. नंतर ती ९० डॉलर प्रतिपिंपापर्यंत खाली आली. इस्त्रायल-हमास युद्धामुळे क्रूड ८० ते ९५ डॉलर प्रति बॅरलच्या दरम्यान जात राहिले. आता ही घसरण गेल्या आठवडाभरापासून सुरूच आहे. ‘ब्लूमबर्ग एनर्जी’वर जारी केलेल्या नवीनतम दरानुसार, ब्रेंट क्रूडचा डिसेंबर फ्युचर्स प्रति पिंप ७३.०६ डॉलर आहे. तर, ‘डबल्यूटीआय’चे नोव्हेंबर फ्युचर्स प्रतिपिंप ६९.२२ वर होते.
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारताचा विचार करता, आतापर्यंत तेल विपणन पेट्रोलियम कंपन्यांनी एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. भारतात सर्वात स्वस्त इंधन विकणारा केंद्रशासित प्रदेश अंदमान-निकोबार आहे. पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबारमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त ८२.४२ रुपये आहे, तर डिझेल ७८.०१ रुपये प्रतिलिटर आहे.
हेही वाचा :