महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून त्यांनी हे व्यक्तव्य केल्याने त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.
Chhagan Bhujbal : राजकारणातून निवृत्तीचे संकेत की भावनिक आवाहन?
लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीची वाट पाहणाऱ्या भुजबळांच्या पदरी निराशा आली होती. नाराज झालेल्या भुजबळांनी आता विधानसभेसाठी दंड थोपटलेत. गेल्या दोन दशकांपासून येवला मतदारसंघावर भुजबळांचं एकहाती वर्चस्व आहे. भुजबळांनी खरोखरच निवृत्तीचे संकेत दिलेत की भावनिक आवाहन करून राजकीय खेळी केली, असाही प्रश्न उपस्थित होतोय.
समीर भुजबळ या पुतण्यासाठी नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ फिल्डिंग लावत आहेत. समीरला नांदगावमध्ये पाय रोवता यावेत म्हणून नेहमीप्रमाणे भुजबळांनी भावनिक साद घातल्याची चर्चा आहे. तर पुतण्यासाठी सेफ ग्राऊंड तयार केल्याचंही बोललं जात आहे. छगन भुजबळांच्या रिटायरमेंटच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रिटायरमेंटचा निर्णय घेताना कुणाला विचारण्याची गरज नसल्याचंही ते म्हणालेत. भुजबळ हे राज्याच्या राजकारणातले मातब्बर नेते. आपल्या आक्रमक भाषणांसाठी ते ओळखले जात असून राजकीय वाऱ्याचा अंदाज बांधण्यातही त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे भावनिक आवाहन करून भुजबळांनी नेमकं काय साधलं? हे येत्या काळात समोर येईल.
हेही वाचा