प्रयागराज : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उप राष्ट्रपती जगदीश धनकड डुबकी मारणार आहेत. एक फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड कुंभमेळ्याला येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळ्याला उपस्थिती लावणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच येथील कुंभमेळ्याला उपस्थिती लावणार आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी अर्धकुंभमेळ्यात उपस्थिती लावून त्यांनी गंगेत स्नान केले होते. १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत.( Kumbhmela President)
दरबारा वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यास १४ जानेवारीला प्रारंभ झाला. देशविदेशातील भाविकांनी महाकुंभात स्नान केले. जगभरातील सेलीब्रेटींनीही उपस्थिती लावली. सर्वत्र कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दीड महिन्याच्या महाकुंभसोहळ्यात ४० कोटी भाविक उपस्थिती लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.( Kumbhmela President)
दरम्यान, मंगळवारी (दि.२१) उद्योगपती गौतम अदाणी महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. आजअखेर नऊ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात उपस्थिती लावून गंगेत डुबकी मारली. त्यांनी इस्कॉन शिबिराला भेट दिली. त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर ते हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले. गौतम अदाणी आणि इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने रोज एक लाख भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीला पवित्र स्नानाचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यादिवशी मोठ्या संख्येने भाविक गंगास्नानास येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन सतर्क झाले आहे. दोन दिवसांपूर्वी महाकुंभनगरीत आग लागून १८० तंबू जळून खाक झाले होते. सिलिंडरचा स्फोट लागून आग लागली होती. ( Kumbhmela President)