कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई येथे झालेल्या एआयटीए राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या संदेश दत्तात्रय कुरळे याने उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत संदेश कुरळेने विश्वजीत सणसचा ६-२ ६-४ पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत कनिष्क जेटलीचा ६-२ ६-१ असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. तीन सेटस् मध्ये झालेल्या उपात्य सामन्यात त्याने दीप मुनीमवर ४-६ ७-६(१) ६-२ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात संदेश कुरळे आणि निरोव शेट्टी भिडले. पहिला सेट निरोवने ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये संदेश चांगली लढत दिली. त्याने टायब्रेकरमध्ये ७-६ असा सेट जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला. शेवटच्या सेटमध्ये निरोवने ६-० अशी एकतर्फीत मात करत विजेतेपद पटकावले. संदेशला उप विजतेपदावर समाधान मानावे लागले. (Sandesh Kurale)
संदेश दत्तात्रय कुरळे कोल्हापूरचा असून अर्शद देसाई टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे. त्याला प्रशिक्षक मनाल देसाई व अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे. (Sandesh Kurale)