महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नॅशनल फिल्म पुरस्काराचे वितरण आज (ता.८) शानदार सोहळ्यात करण्यात आले. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार करण्यात आला. अभिनेता रजत कमल यांना ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी तर ‘गुलमोहर’ चित्रपटासाठी राहुल व्ही. चित्तेला यांचा यात समावेश आहे. (National Film Awards)
नॅशनल फिल्म पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना प्रदान करण्यात आला. ‘गुलमोहर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर पटकथा आणि लेखक राहुल व्ही. चित्तेला यांना ‘गुलमोहर’साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा नॅशनल फिल्म पुरस्कार मिळाला.
‘पोनियान सेल्वन २’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.पुरस्कार अभिनेता मणिरत्नम यांनी स्विकारला. तेलगू चित्रपट ‘कार्तिकेय २’ साठी अभिनेता अभिषेक अग्रवाल यांना सन्मानित करण्यात आहे. ‘KGF Chapter २’ ला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. तर दुसरीकडे या सोहळ्यात ‘गुलमोहर’ ला विशेष पसंती मिळाली. हा पुरस्कार घेण्यासाठी मनोज बाजपेयी आले होते. या दिमाखदार सोहळ्याला निर्माता करण जोहर, ए.आर रहमान, नीना गुप्ता यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होता.
पहा विजेत्यांची यादी
- सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन (पुष्पा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), कृती सेनॉन (मिमी)
- सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
- सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाईल्स)
- सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट- रॉकेट्री द नांबी इफेक्ट
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – आरआरआर
- सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (हिंदी)- सरदार उधम
- सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (कन्नड)- 777 चार्ली
- सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (तमिळ)- कदायसी विवासई
- सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (तेलुगु)- उपेन्ना
- सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (असामी)- अनुर
- सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट (मल्याळम)- होम
- सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- आरआरआर
- सर्वोत्कृष्ट लिरिक्स- कोंडापोलम
- सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम- सरदार उधम
- सर्वोत्कृष्ट एडिटिंग- संजय लीला भंसाली (गंगूबाई काठियावाड़ी)
- सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले- गंगूबाई काठियावाड़ी
- सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम
- सर्वोत्कृष्ट डायरेक्टर – निखिल महाजन (गोदावरी, मराठी फिल्म)
- सर्वोत्कृष्ट संगीत- पुष्पा (देवी श्री प्रसाद) , आरआरआर (एमएम कीरावनी)
- स्पेशल ज्युरी ॲवार्ड – शेरशाह
- सर्वोत्कृष्ट बुक ऑन सिनेमा- म्युझिक बाय लक्ष्मीकांत प्यारेलाल (लेखक – राजीव विजयकर)
- सर्वोत्कृष्ट फिल्म ऑन सोशल इशू- अनुनाद