नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला आहे. आता आपले पंतप्रधान मोदी कुठेच दिसत नाही. त्यामुळे आतातरी वास्तव स्वीकारा, असा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (७ एप्रिल) केला.(Rahul attacks Modi)
भारताला वास्तव स्वीकारावे लागेल. सर्व भारतीयांचा विकास साधणारी लवचिक, उत्पादन-आधारित अर्थव्यवस्था उभारण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणावर जगभरातील त्यांचे व्यापारी भागीदार देशांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आठवड्याच्या प्रारंभीच, सोमवारी जगभरातील शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका केली. (Rahul attacks Modi)
ते म्हणाले, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. येथील १% पेक्षा कमी लोकांनी त्यांचे पैसे शेअर बाजारात गुंतवले आहेत, याचा अर्थ शेअर बाजार तुमचे क्षेत्र नाही. त्यात अमर्यादित पैसे कमवले जातात, पण तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही.”
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्रम्प धोरणावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘ मुंबई शेअर बाजार जवळजवळ ४,००० अंकांनी घसरला. भारतीय इतिहासातील ही सर्वांत मोठी घसरण आहे. स्वातंत्र्यानंतर, मला वाटते की ही पाचवी किंवा सहावी सर्वात मोठी घसरण आहे. अर्थात, हे अमेरिकन धोरणांमुळे झाले आहे. विशेषतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांवर मोठे आयात कर लादले आहेत. त्याचा हा परिणाम आहे.’’ (Rahul attacks Modi)
अमेरिकेचा मूर्खपणा : अर्थमंत्री, जर्मनी
दरम्यान, जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी अमेरिकेचे नव करधोरण निव्वळ मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.
जर्मनीचे अर्थमंत्री म्हणतात, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापक कर आकारणीचा आधार “मूर्खपणा” आहे. युरोप मजबूत स्थितीत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. रॉबर्ट हॅबेक यांनी सोमवारी लक्झेंबर्ग येथे युरोपियन युनियनच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी जाताना सांगितले की त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “शांतपणे, विवेकाने पण स्पष्टपणे आणि दृढनिश्चयाने” वागले पाहिजे. (Rahul attacks Modi)
त्यांनी म्हटले की याचा अर्थ “आपण एका मजबूत स्थितीत आहोत हे स्पष्ट असणे. अमेरिका कमकुवत स्थितीत आहे.” त्यांनी असा युक्तिवाद केला की “आपल्याकडे आता काळाचा दबाव नाही,” परंतु अमेरिकेवर आहे.
युरोपियन युनियनने एकत्र राहणे महत्त्वाचे आहे, कारण वैयक्तिक देशांनी सूट मिळविण्याचे प्रयत्न भूतकाळात यशस्वी झाले नाहीत. त्यांनी दक्षिण अमेरिका, आशिया आणि पॅसिफिक सारख्या जगातील इतर प्रदेशांशी व्यापार करार आणि संपर्क मजबूत करणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.
हेही वाचा :
तमिळनाडूतील मंत्र्यासह मुलावर ईडी छापे
युवकांच्या प्रचंड प्रतिसादात राहुल गांधींची पदयात्रा