कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे हृदयविकाराने निधन झाले. माजी महापौर सरिता मोरे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नंदकुमार मोरे हे गेले दोन दिवस आजारी होते. त्यांना कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते. उपचार सुरू असताना हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. (Former corporator Nandkumar More passes away)
नंदकुमार मोरे यांचे बंधू सुभाष मोरे हे नगरसेवक होते. २००० मध्ये नंदकुमार मोरे खोलखंडोबा प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. पहिल्याच वर्षी ताराराणी आघाडीच्या महादेवराव महाडिक यांनी स्थायी समिती अध्यक्षपदी त्यांना संधी दिली. त्यांनी केएमटीला भरीव निधी उपलब्ध करुन दिल्याने केएमटी रुळावर आली. महानगरपालिकेतील विद्युत विभागातील भ्रष्टाचार त्यांनी पाठपुरावा करुन उघडकीस आणला होता. त्यामुळे विद्युत विभागातील एका उपअभियंत्याला निलंबित करुन विभागीय चौकशी लावली होती. नंदकुमार मोरे यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. नुकत्याच झालेली महानगरपालिका निवडणूकही लढवली होती. पण ते थोडक्या मतांनी पराभूत झाले होते. (Former corporator Nandkumar More passes away)