मुंबई : विशेष प्रतिनिधी : नांदेड लोकसभा पोटनिवडुकीसाठी काँग्रेसने रविद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रवींद्र पवार हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. काल रात्री झालेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये नांदेड लोकसभेच्या पोटनिवडुकीसाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव एकमतान ठरवण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. (Nanded Lok Sabha Bypolls)
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण नांदेड मतदार संघातून निवडूण आले होते. मात्र काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. यामुळे वसंतराव चव्हाण यांच्या जागी त्यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. त्यानंतर काँग्रेसच्या छाननी समितीनेही रविंद्र चव्हाण यांचे नाव एकमताने ठरवले होते. आज काँग्रेस पक्षाने याबद्दलची अधिकृत घोषणा केली.
२०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण नांदेड लोकसभेतून निवडून आले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. वसंतराव चव्हाण यांच्या ठिकाणी त्यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात येईल, अशा चर्चा सुरुवातीपासून होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या छाननी समितीनेही एकच नाव एकमताने ठरवले होते. आज काँग्रेस पक्षाने याबद्दलची अधिकृत घोषणा केली. मात्र यानंतर भाजप ही जागा लढवणार का आणि लढवत असताना उमेदवार कोण देणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे. (Nanded Lok Sabha Bypolls)
पोटनिवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला
वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्टला निधन झाले. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. यानुसार येत्या २० नोव्हेंबरला नांदडेमध्ये विधानसभेसह लोकसभेसाठीही मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Congress nominates Ravindra Vasantrao Chavan as its candidate for Maharashtra’s Nanded Lok Sabha bye-elections and Jingjang M. Marak for Meghalaya’s Gambegre assembly constituency bye-elections. pic.twitter.com/sM3pOODgf0
— ANI (@ANI) October 17, 2024
हेही वाचा :