मुंबई : विशेष प्रतिनिधी : पोलिसांनी कर्नाटकातील एका मोठ्या एमडी ड्रग मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीचा पर्दाफाश करीत ४०० कोटीं रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही उच्चभ्रू वर्गातील काहीजणांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Drugs factory destroyed)
साकीनाका पोलिसांनी ही कारवाई करत चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १८८ किलो मेफेड्रोन (एमडी ) जप्त केले हे सर्वजण मुंबई शहरात एमडी ड्रग पुरवठा करत होते. आत्तापर्यंत एकूण ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या ड्रग्सप्रकरणी साकीका पोलीस ठाण्यात एप्रिलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासदरम्यान पोलिसांना म्हैसूरमधील ड्रग्स फॅक्टरीचा तपास लागला. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी कर्नाटक राज्यात धाड टाकली. या कारवाईत ३९० कोटीचे आमली पदार्थ ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ-१० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. (Drugs factory destroyed)
एप्रिलच्या अखेरीस साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये ड्रग्स प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे तपास करत पहिल्या आरोपीकडून ५२ ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले होते. याच प्रकरणात अजून तीन आरोपींना अटक करण्यात आली. सुरुवातीच्या दोन आरोपींकडून ४ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून पोलिसांना म्हैसूरच्या फॅक्टरीचा तपास लागला. या आरोपींकडे एमडी ड्रग्सचा पुरवठा हा म्हैसूरच्या बाहेर उभारण्यात आलेल्या फॅक्टरीतून होत होता.