नवी दिल्ली : तब्बल महिनाभर अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण सुरू असलेले युद्ध दोन ते तीन आठवड्यात संपेल असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. पण इराणने मात्र आम्ही आमच्या अटीवरच युद्ध संपवू असे स्पष्ट करताना आखातातील अमेरिकेच्या बड्या १८ कंपन्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे हे युद्ध् आणखी चिघळण्याची भिती व्यक्त केली आहे. (War would end within two or three weeks)
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले “इराणसोबत सुरू असलेले युद्ध पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये संपू शकते. अमेरिकेने आपले लक्ष्य साध्य केले आहे आणि ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. अमेरिकेचा उद्देश इराणला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखणे हा होता. हे आता पूर्ण झाले आहे. करार झाल्यास युद्ध आधीही संपू शकते.” असे म्हणत त्यांनी युद्ध संपवण्याची भाषा केली आहे. तर, होर्मुजची सामुद्रधुनी खुली ठेवणे ही अमेरिकेची जबाबदारी नाही. इतर देशांनी आपल्या हिताचे रक्षण स्वतःच केले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. (War would end within two or three weeks)
आमच्या अटी मान्य कराव्या लागतील ; इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन
अमेरिकेनंतर इराणनेही युद्ध संपवण्याबाबत विधान केले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन म्हणाले की, “आम्हालाही युद्ध नको आहे, पण हे युद्ध संपवायचे असल्यास आमच्या काही अटी आहेत ज्या अमेरिकेसह इस्रायलला मान्य कराव्या लागतील. त्यातील एक सर्वात महत्त्वाची अट म्हणजे भविष्यात इराणवर हल्ला होणार नाही. हा संघर्ष पुन्हा उद्भवणार नाही याची हमी आम्हाला हवी आहे.” असे ते म्हणाले आहेत. युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (War would end within two or three weeks)
इराणची अमेरिकन कंपन्यांना धमकी
भविष्यात जर कोणत्याही इराणी नेत्याची हत्या झाली, तर ते आखाती देशांमध्ये स्थित अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करतील. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या प्रमुख तंत्रज्ञान आणि संरक्षण-संबंधित कंपन्यांना आपली लक्ष्ये म्हणून निश्चित करतील, अशी धमकी इराणनने दिली आहे. या कंपन्यांमध्ये सिस्को, एचपी, इंटेल, आरॅकल, मायक्रोस्कॉफ्ट, अपल, गुगल, मेटा, आयबीएम, डेल, पलांटिर, नवीदिया, जेपी मॉर्गन, टेस्ला, जनरल इलेक्टिक, स्पायर सोलुशन, जी ४२, आणि बोईंग यांचा समावेश आहे. या कंपन्या इस्रायली आणि अमेरिकन लष्करी तसेच गुप्तचर संस्थांशी सहकार्य करत असल्याचा दावा इराणने केला. तसेच, इराणने या कंपन्यांना आपल्या देशाविरुद्ध झालेल्या सायबर हल्ल्यांसाठी जबाबदार धरले आहे. (War would end within two or three weeks)