मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एक महिन्याची मुदतवाढ दिली असताना त्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला. रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपने हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. दिल्लीवरुन आलेल्या आदेशामुळे मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची वाढ दिली असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना शिंदे गटाच्या मराठी भाषेच्या मोहिमेला अमित शाह यांनी केराची टोपली दाखवली अशी टीका केली. (Sanjay Raut criticizes Pratap Sarnaik)
शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठीसाठी लढाई
मुंबईतील रिक्षा टॅक्सीचालकांना मराठी भाषा यायला पाहिजे ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठीसाठी आमची लढाई सुरू आहे. मराठी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे. बांधकाम मजूरापासून कार्पोरेटमध्ये काम करणाऱ्याला मराठी आली पाहिजे अशी शिवसेनेची स्थापनेपासून भूमिका आहे. पण शिंदे गटाने चालकांना मराठी भाषा शिकण्याचा निर्णय घेतला होता. पण निर्णय राबवण्याच दिशेने पाऊल टाकल्यावर शिंदे गटाने शेपूट का घातले असा सवाल केला. मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाने बंड करायला हवे होते. मराठीसाठी माझे मंत्रीपद गेले तरी चालेल असे म्हणायला पाहिजे होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेच्या गोष्टी करत असतात. पण त्यांनी आम्ही अमित शाह यांचा निर्णय मानणार नाही असे म्हणायला हवे होते. (Sanjay Raut criticizes Pratap Sarnaik)
दिल्लीच्या आदेशामुळे मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढ
मराठी भाषा शिकवण्यासाठी तीन महिने मदत दिली होती ती आता एक वर्षे वाढवली आहे. म्हणजेच शिवसेना शिंदे गटाच्या मराठी मोहिमेला अमित शाह यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आज पुन्हा उघड झाले आहे की तुमचा पक्ष अमित शाह चालवतात असा टोलाही त्यांनी मारला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरू केलेली मोहिम किती टोकाला नेऊ शकतात यावर आम्ही लक्ष ठेऊन होतो. पण आम्हाला खात्री होती की दिल्लीहून एक आदेश येईल आणि ते माघार घेतील. आणि तसेच घडले आहे. दिल्लीहून आदेश येतात मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा शिकण्यास एक वर्षाची मुदत वाढ दिली याकडे त्यांनी लक्ष वेधले. मराठी भाषेच्या शिकवण्याच्या मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांशी किंवा अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती का असा सवालही राऊत उपस्थित केला. (Sanjay Raut criticizes Pratap Sarnaik)