सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव इव्हीएम विरोधातील आंदोलनाचे प्रेरणास्थान बनले आहे. विधानसभा निवडणुकीत इव्हीएमद्वारे मतदानामध्ये घोळ झाल्याचा राज्यभरातील लोकांचा संशय आहे. परंतु मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने केलेल्या कृतीला देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीला समर्थन दिले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही इथून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रक्रियेविषयी लोकांना शंका असेल तर ती तशीच रेटून नेणे लोकशाहीविरोधी आहे. देश किंवा राज्याचे सरकार ठरवणा-या निवडणुका पारदर्शी आणि निष्पक्ष व्हायच्या असतील, त्यावरील लोकांचा विश्वास बळकट व्हायचा असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी मान्य व्हायला हवी.
Maharashtra Dinman
बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात सोमवारी (दि.९) होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. तथापि, महामेळावा घेणारच आणि महाराष्ट्रात गेल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बोलून दाखवला.
बेळगाव शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्ब्यांग यांनी महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता समितीचा महामेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने धास्ती घेऊन शहरातील धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सीन डेपो अशा पाच ठिकाणी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, माजी आमदार मनोहर किणेकर, समिती नेते आर. एम.चौगुले, शुभम शेळके आणि कार्यकर्त्यांनी व्हॅक्सीन डेपो येथेही भेट देऊन पाहणी केली.
महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रात गेल्यावरच हे आंदोलन बंद होईल. यापूर्वीही अनेकदा पोलीस खात्याने दबाव तंत्र वापरून आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मराठी माणसाने दाद दिली नाही. कोणत्याही परिस्थितीत सोमवारी आम्ही महामेळावा घेणारच असा निश्चय समिती नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२५ वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. वर्षभरात २४ सुट्टी मिळणार आहेत. पण पाच सुट्ट्या हे शनिवार आणि रविवारी आल्याने त्या बुडणार आहेत. प्रजासत्ताक दिन, रामनवमी, गुढीपाडवा, मोहरम हे सण रविवारी तर तर बकरी ईद शनिवारी सुट्टी बुडणार आहे. तर पारशी दिन, स्वातंत्र दिन (१५ ऑगस्ट) आणि गांधी जयंती, दसरा (२ ऑक्टोबर) एकाच दिवशी आल्याने दोन सुट्ट्या बुडाल्या आहेत. (Public Holidays)
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी अशी
प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी,रविवार), शिवजयंती (१९ फेब्रुवारी, बुधवार), महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी, बुधवार), होळी,धुलीवंदन (१४ मार्च, शुक्रवार), गुढीपाडवा (३० मार्च, रविवार), रमजान ईद (३१ मार्च, सोमवार), रामनवमी (६ एप्रिल, रविवार), महावीर जयंती (१० एप्रिल, गुरुवार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल, सोमवार), गुड फ्रायडे (१८ एप्रिल, शुक्रवार), महाराष्ट्र दिन (१ मे, गुरुवार), बुद्ध पोर्णिमा (१२ मे, सोमवार), बकरी ईद (७ जून, शनिवार), मोहरम (६ जुलै,रविवार), स्वातंत्र दिन (१५ ऑगस्ट , शुक्रवार), पारशी दिन (१५ ऑगस्ट, शुक्रवार), गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट, बुधवार), ईद ए मिलाद (५ सप्टेंबर, शुक्रवार), महात्मा गांधी जयंती, (२ ऑक्टोबर, गुरुवार), दसरा(२ ऑक्टोबर, गुरुवार), दीपावली अमावस्या (२१ ऑक्टोबर, मंगळवार), दीपावली पाडवा (२२ ऑक्टोबर, बुधवार), गुरुनानक जयंती (५ नोव्हेंबर, बुधवार), ख्रिसमस (२५ डिसेंबर, गुरुवार).
हेही वाचा :
बडोदा : गोहत्येचा बनावट गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तिघा पोलिसांसह दोघा साक्षीदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेश न्यायालयाने दिले. गुजराच्या गोध्रामधील पंचमहल सत्र न्यायालयाने हे आदेश दिले. (Panchmahal Sessions Court)
पाचवे अतिरिक्त सत्र न्यायाधीश परवेजाहेमद मालवीय यांनी मंगळवारी हा आदेश दिला. त्यानुसार जिल्हा न्यायालयाचे रजिस्ट्रार आर. एस. अमीन यांना सहायक हेड कॉन्स्टेबल रमेशभाई नरवतसिंह आणि शंकरसिंह सज्जनसिंह आणि पोलीस उपनिरीक्षक एम. एस. मुनिया आणि साक्षीदार मार्गेश सोनी आणि दर्शन उर्फ पेंटर पंकज सोनी यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. या अधिकाऱ्यांविरोधात विभागीय कार्यवाही करण्याचे आदेशही पंचमहलच्या पोलीस अधीक्षकांना दिले.
इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २४८ अंतर्गत (भारतीय दंड संहितेचे कलम २११) आरोपी व्यक्तींविरुद्ध खोटी फौजदारी कारवाई केल्याबद्दल कोर्टाने हे आदेश दिले. (Panchmahal Sessions Court)
‘कथित गोहत्ये’साठी जनावरे घेऊन जाणाऱ्या ज्या दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते त्यांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता करताना त्यांच्या वाहनातून ताब्यात घेतलेली जनावरे तत्काळ त्यांच्याकडे सोपवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. नजीरमिया सफीमिया मालेक (रा. रुदन, खेडा) आणि इलियास मोहम्मद दावल (रा. वेजपूर, गोध्रा) अशी सुटका झालेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याविरोधात पशू क्रूरता अधिनियम १८६० नुसार ३१ जुलै २०२०मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ संशयावरून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यासाठी कोणताही सबळ पुरावा पोलिसांकडे नाही, याकडे कोर्टाने लक्ष वेधले.
पोलिसांचे साक्षीदार ८ ते १० किमीवर राहणारे
कोर्टाने बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादाचा विचार केला. वासापूर क्रॉसरोडवर गोवंशाची वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले. पण ज्या दोघांची साक्ष पोलिसांनी नोंदवली त घटनास्थळापासून ८ ते १० किमीवर राहतात. याचा अर्थ असा होतो की या दोघा साक्षीदारांना ‘पोलिसांनी बोलावले’ होते. पंचनामा करताना स्थानिक रहिवाशीच असावा, असा प्रोटोकॉल असताना पोलिसांनी तो पाळला नाही, ही बाब कोर्टाने स्पष्ट केली. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
मार्गेश सोनी या साक्षीदारीच साक्ष विश्वसनीय नाही. तो एक गोरक्षक आहे आणि अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांत तो कायम साक्षीदार राहिला आहे, याकडे कोर्टाने लक्ष वेधले.
हेही वाचा :
मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या सुपरहिट जोडीचा पुष्पा २: द रुल हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत असून हिंदी भाषेतील या चित्रपटाने तिसऱ्यादिवशी २०५ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर अन्य सहा भाषातील या फिल्मने ३८७.९५ कोटी तर वर्ल्डवाईड ५९८ कोटी ९० रुपयांची कमाई केली आहे. हिंदी भाषेतील या चित्रपटाने शाहरुख खानच्या जवान आणि एनिलमल या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहेत. (Pushpa 2 Collection)
तीन दिवसात पुष्पा टू ने हिंदी भाषेतील चित्रपटाने २०५ कोटींचा व्यवसाय केला. यापूर्वी शाहरुखनच्या जवान चित्रपटाने १८०.४५ कोटीचा व्यवसाय केला होता. अॅनिमलने १७६.१८ कोटी, पठाण चित्रपटाने १६१, टायगर थ्री ने १४४.५०, केजीएफ टू हिंदी चित्रपटाने १४३.६४ कोटीचा व्यवसाय केला होता. स्त्री टू ने १३६.४० कोटी, गदर टू ने १३४,८८ कोटी, बाहुबली टू हिंदी चित्रपटाने १२८ कोटी तर संजू चित्रपटाने १२०.०६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
पुष्पा टू चित्रपटाने पहिल्या दिवशी ७२ कोटी रुपयांचा तर दुसऱ्या दिवशी ५९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी व्यवसाय कमी झाला असला तरी पहिल्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७४ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तीन दिवसात २०५ कोटींचा व्यवसाय करुन बॉक्स ऑफीसवर धुमधुडाका केला आहे.
चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या अप्रतिम अभिनय करुन पब्लिकला जाम खूष केले. चित्रपटातील अक्शन जबरदस्त आहेत. अल्लू अर्जुनच्या डायलॉगला पब्लिक पसंती देत आहे. चित्रपटात काही गोष्टी कमी असल्या तरी सिनेफोटोग्राफीवर पब्लिक जाम खूष आहे. (Pushpa 2 Collection)
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गूगल मॅपमुळं बरेलीमध्ये अपघात झाला आणि तिघांना जीव गमावावा लागला. गूगल मॅपमुळं बिहारमधून गोव्याला निघालेल्या कुटुंबाला बेळगावजवळ जंगलात नेऊन सोडलं… या अलीकडच्या घटनांवरून गूगल मॅप चर्चेत आला आहे. त्याबद्दलचं कुतूहल वाढलं आहे. गूगल मॅप (Google Maps) काम कसा करते, ते रस्ता कसा दाखवते, रस्ता का चुकतो… अशा अनेक प्रश्नांचा वेध घेण्याचा एक प्रयत्न…
गूगलने सुरुवातीच्या काळात Keyhole नावाची कंपनी खरेदी केली होती. या कंपनीनं एक मॅप किंवा तशा प्रकारे काही बनवलं होतं, परंतु ते डेस्कटॉपपुरतं मर्यादित होतं. याच कंपनीच्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गूगलनं मॅप डेव्हलप केला. काही अन्य कंपन्यांबाबतही असाच संभ्रम आहे. गूगल मॅप्सच्या सॅटेलाइटसंदर्भातही असाच संभ्रम आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून गूगल लाइव्ह डेटा आणि फोटो घेते, असा एक समज आहे. त्यात तथ्य असलं तरी ते तसंच नाही. अगदी सुरुवातीच्या काळात गूगलनं मॅप डेव्हलप करायला एका सॅटेलाइट सर्व्हिसची मदत घेतली होती. मॅप तयार झाला. इमारती, दवाखाने, नदी, पूल अशा सगळ्या गोष्टी मॅपवर दिसायला लागल्यावर गूगलनं सॅटेलाइटशी संबंध तोडून टाकले. त्याचं कारण असं की सॅटेलाइटचा व्यवहार महागडा होता आणि गूगल मॅपची सेवा मोफत होती. याउपर गूगल सॅटेलाइटची मदत घेत असेल तर त्याची कल्पना नाही.
Maxar Tech ही एक अवकाश, सॅटेलाइट यासंदर्भात काम करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून गूगल आवश्यकतेनुसार फोटो खरेदी करते. आवश्यकता असेल तेव्हाच करते, कारण हा मोठा खर्चिक मामला आहे. तुम्ही जेव्हा मॅपवर सॅटेलाइट व्ह्यू पाहाल तेव्हा या कंपनीचं नाव क्रेडिटमध्ये दिसेल. कारण अलीकडं सगळे फोटो थ्रीडी दिसतात, त्यामुळं वाटतं की, सगळं लाइव्ह आहे.
मग प्रश्न असा पडतो की गूगलकडं हा डेटा येतो कुठून?
गूगलला त्यासाठी कुठंही जावं लागत नाही. तुम्ही-आम्हीच त्यांचा सगळ्यात मोठा सोर्स आहोत. जगभरातले कोट्यवधी स्मार्टफोन वापरकर्ते मिळून मॅप तयार करतात. कधी सरळ आणि कधी वाकडे तिकडे. मॅप हा एक ओपन सोर्स आहे किंवा क्राउड सोर्स प्लॅटफॉर्मही म्हणू शकता. इथं सगळेच डेटा अपलोड करतात. भारतात सरकारी संस्था मॅपवर डेटा अपलोड करीत नसले तरी विदेशात अनेक देशांमध्ये डिजिटल मॅप गूगल मॅपवर अपलोड होतो आणि अपडेटही. त्यानंतर तुम्ही आम्ही येतो. म्हणजे गूगल आपला पाठलाग करीत असते. आपल्यावर गूगलची नजर असते. आपल्याकडं लोकेशन ट्रॅकिंगचा पर्याय असला तरी तो वेळोवेळी सुरू किंवा बंद करावा लागतो. हाच डेटा मॅपसाठी उपयुक्त ठरत असतो.
Google Maps अपडेशन महत्त्वाचं
याचबरोबर मॅपवर डेटा अपलोड करण्याचीही सुविधा आहे. तुमच्याकडे गूगल अकाउंट असेल तर तुम्हीही डेटा अपलोड करू शकता. म्हणजे तुमचं दुकान असेल, संस्था असेल किंवा घर असेल. मॅपवर काँट्रिब्यूट करण्याचा पर्याय स्क्रीनवरच दिसतो. मॅपवरचं हे अद्ययावतीकरण म्हणजे अपडेशन अत्यंत महत्त्वाचं असतं. तेच मॅपला रस्ता दाखवतं. हे अपडेशन झालं नाही तर त्यातून रस्ता चुकण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही छोट्या गोष्टी अपडेट केल्या तर त्याची पडताळणी होत नाही. परंतु तुम्ही मोठ्या गोष्टी अपडेट केल्या म्हणजे हॉस्पिटल, विद्यापीठ, कारखाना वगैरे तर गूगलची टीम त्याची पडताळणी करते आणि त्यानंतरच ती दुरुस्ती केली जाते.
गूगल कारची टेहळणी
गूगल कार हे डेटा कलेक्शनचे प्रमुख माध्यम आहे. गूगल स्ट्रीट व्ह्यू याच कारमुळं पाहू शकतो. डोक्यावर मोठा कॅमेरा बांधून ही कार सगळीकडं फिरत असते. इमारती, रस्ते, झाडांचे फोटो घेत असते. त्यामुळं आपल्याला स्क्रीनवर त्या ठिकाणचा व्ह्यू दिसतो. डेटा कलेक्शन कसं केलं जातं, हे लक्षात येतं. परंतु खरा प्रश्न असतो तो म्हणजे गूगल मॅप आपल्याला रस्ता कसा दाखवतो?
जीपीएसची मदत
लोकेशन सर्व्हिस अनेकदा सुरू, बंद करावी लागते. आपल्याला मॅप आवश्यक नसला तरी हे करावं लागतं. जेवणाची ऑर्डर द्यायची असेल, औषधं मागवायची असतील तर हे करावं लागतं. लोकेशन ऑन म्हणजे जीपीएस कनेक्ट. ज्या ज्या वेळी आपण गूगलला रस्ता विचारतो तेव्हा गूगल मदतीला येते. आधीपासून उपलब्ध असलेला डेटा, आणि त्याक्षणी त्या मार्गावरून चाललेल्या फोनच्या मदतीनं गूगल तुम्हाला अधिक मोकळा असलेला रस्ता सुचवते. त्या परिसरात किती स्मार्टफोन एक्टिव्ह आहेत, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्याच आधारे त्या रस्त्यावरील ट्राफिक आणि लागणारा वेळ सांगितला जात असतो. जितके अधिक स्मार्टफोन असतील तेवढा खात्रीशीर डेटा मिळतो.
एखाद्या परिसरात स्मार्टफोन कमी असतील तर मॅपची थोडी गडबड होते. आता तर मॅपकडून रस्ता दाखवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय)चा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी ठराविक एरियात ट्राफिक किती आहे, त्याचा विचार करून मार्ग सुचवला जातो. यावरून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे एखाद्या एरियातून एखादा माणूस अनेक स्मार्टफोन घेऊन निघाला तर गूगल त्या रस्त्यावर लाललाल खुणा दाखवेल का?
मागं एकदा आपण तसं चित्रही पाहिलंय. आधी ते व्यंगचित्र वाटलं, परंतु ती वस्तुस्थिती होती. तशी घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. सायमन वेकर्ट नावाच्या गृहस्थानं ९९ स्मार्टफोन एकत्र ठेवून बर्लिनच्या रिकाम्या रस्त्यावर ट्राफिक असल्याचा आभास निर्माण केला होता. मॅप त्याठिकाणी स्लो मूव्हिंग दाखवत होता. गूगलनं त्यापासूनही धडा घेतला आहे आणि या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बरेलीमध्ये काय झालं?
बरेलीमध्ये गुरुग्रामहून निघालेल्या तिघांना गूगल मॅपनं (Google Maps) एका बांधकाम सुरू असलेल्या फ्लायओव्हरवर नेलं. आणि त्यांची कार नदीत कोसळली. या प्रकरणामध्ये मामला अद्ययावतीकरणाचा म्हणजे अपडेशनचा असल्याचे मानले जाते. नदीवर बांधलेला पूल कोसळला होता त्यामुळं त्यावर वाहतूक नव्हती. त्यामुळं मॅपवर रस्ता दिसत असावा. गूगल मैपपासून mapmyindia और इस्रोच्या bhuvan मध्येही इथं रस्ता दिसत होता. इथं अपडेशन झालं असतं तर ही दुर्घटना झाली नसती. परंतु निष्काळजी झाली आणि त्यात तिघांचे बळी गेले. याला जबाबदार कोण, हे चौकशीअंती समोर येईल.
सगळ्यांसाठीच एक महत्त्वाची विनंती राहील, ती म्हणजे गूगल मॅप असेल किंवा आणखी कुठला नकाशा. केवळ मॅपच्या भरवशावर राहू नका. शंका येईल तिथं लोकांशी बोला, लोकांना विचारा.
मॅपवर किंवा आपल्या कारच्या पाठीमागील कॅमे-यावर दिलेली सूचना किंवा इशारा आपण वाचत नाही. तो वाचला तर तेही हेच सांगतील. स्क्रीनवर लिहिलेलं असतं की, कॅमे-याचा व्ह्यू तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्ही आजुबाजूला अवतीभवती बघूनच गाडी चालवा. शेअर खरेदी असो, कुणाच कर्ज घ्यायचं असो किंवा आणखी काही. आपल्याला कागदपत्रं वाचायची सवय नसते. त्याच पद्धतीनं आपण गूगलवर जेव्हा सुरुवातीला लॉगिन केलेलं असतं, तेव्हा अनेक अटी-शर्ती असतात आणि आपण त्या मान्य केलेल्या असतात. त्यामुळं रस्ता चुकला किंवा अपघात झाला म्हणून कसलाही दोष गूगल मॅपवर थोपवता येत नाही. गूगल मॅपला कायद्याच्या कचाट्यात अडकवता येत नाही. (Google Maps)
(विविध माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे)
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अंडर -१९ आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगला देशने भारताला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगला देशने भारताला विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १३९ धावांमध्ये गुंडाळला. गोलंदाजीत बांगलादेशचा कर्णधार अझीझुल हाकीम तमिम आणि इक्बाल हुसैन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत भारतीय संघाला अडचणीत आणले. या दोघांशिवाय अल फहाद याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत बांगला देशने सलग दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरले. (IND vs BAN u 19)
सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगला देशला भारताने १९८ धावांवर रोखले. यावेळी भारतीय संघ सामन्यात आरामात विजयी होईल असे सर्वांना वाटत होते. परंतु, भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर आयुष म्हात्रे एका धावकरून तंबूत परतला. यानंतर वैभव सूर्यवंशी अवघ्या ९ धावांवर बाद झाला. आंद्रे सिद्धार्थ आणि केपी कार्तिकेया यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सिद्धार्थ २० आणि केपी २१ धावा करून माघारी फिरले.
यानंतर कर्णधार मोहम्मद अमान २६ धावा करून बाद झाला. हार्दिक राजनने २१ चेंडूत २४ धावा केल्या. त्याच्याशिवाय चेतन शर्मानं केलेल्या १० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. (IND vs BAN u 19)
बांगला देशच्या गोलंदाजांची महत्वाची भूमिका
बांगलादेशचा कर्णधार अझीझुल हाकीम तमिम आणि इक्बाल हुसैन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत भारतीय संघाला अडचणीत आणले. या दोघांसह अल फहादने दोन विकेट्स घेतल्या. रिझान हुसैन आणि मारुफ यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
𝗕𝗢𝗪 𝗗𝗢𝗪𝗡 𝗧𝗢 𝗧𝗛𝗘 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦! 🏆
Presenting the winners of the #ACCMensU19AsiaCup 2024 – Bangladesh U19! 🇧🇩#ACC pic.twitter.com/l0VYQdPLRu
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 8, 2024
हेही वाचा :
-निळू दामले
राज कपूर वयाच्या तिसऱ्या वर्षी १९२७ साली मुंबईत आला. पृथ्वीराज कपूर हे त्याचे वडील. राज कपूरचं त्यावेळचं नाव होतं सृष्टीनाथ कपूर. पृथ्वीराज पेशावरहून मुंबईत आले होते. कारण ते अर्देशीर इराणीच्या ‘आलम आरा’ या भारतातल्या पहिल्या बोलपटात काम करणार होते.
मुंबईत पोचल्यावर लगोलग वयाच्या पाचव्या वर्षी राज कपूरनं ‘टॉय कार्ट’ या नाटकात काम केलं. त्यात त्याला बक्षीसही मिळालं.
१९३५ मधे ‘इन्किलाब’ मधल्या अभिनयानं राज कपूरची चित्रपट कारकीर्द सुरु झाली.
तो काळ कसा होता?
१९३६ मधे व्ही. शांताराम यांच्या ‘अमर ज्योती’ या चित्रपटाचं व्हेनिस महोत्सवात कौतुक झालं. पाठोपाठ १९३७ साली ‘संत तुकाराम’ व्हेनिस महोत्सवात दाखल झाला. ज्युरींनी या चित्रपटाचा विशेष उल्लेख केला. ‘संत तुकाराम’मधे तुकाराम गरूडाच्या पाठीवर बसून वैकुंठाकडं गेल्याचा ट्रिक सीन होता.
चित्रपटांवर वैचारिकतेची, सुधारणा इत्यादी सामाजिक चिंतांची गडद छाया होती. चित्रपट काय, साहित्य काय, पत्रकारी काय, प्रवचनं असत. करमणुकीला मान्यता नव्हती. मराठीत कादंबरी त्या काळात प्रसिद्ध झाली आणि कादंबरी हा प्रकार छचोर आहे, अशी टीका झाली होती.
१९४३ साली पडद्यावर आलेल्या ‘किस्मत’नं सिनेमा या विषयाला एक निर्णायक वळण दिलं. अशोक कुमार नायक होता. गुन्हेगार होता. दुष्ट व्यक्ती नायक म्हणून दाखवलेला हा पहिलाच चित्रपट. चित्रपटातली नायिका कुमारी असतांनाही गरोदर झाल्याचं चित्रपटात दिसलं. गुन्हे, थरार इत्यादी नाट्यमय घटक चित्रपटात भरपूर होते. चित्रपट खूपच गाजला. चित्रपटानं खूप गल्ला गोळा केला.
राज कपूरला ती शैली सापडली.
१९४८ साली राज कपूरनं ‘आग’ केला.
१९३५ ते १९४८ या काळात भारतात फार उलथापालथी झाल्या. दुसरं महायुद्ध झालं. स्वातंत्र्य चळवळ जोरात चालली. गांधी-नेहरू-पटेल; सावरकर, जिन्ना, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस अशा अनेक विचारछटा राजकारणात उमटल्या. पैकी नेहरूंची छटा समाजवादी होती. बंगालमधे दुष्काळ झाला. गांधीजींचा खून झाला. फाळणी झाली. स्वातंत्र्य मिळालं.
आपण खूप गमावलंय, पण स्वातंत्र्यानंतर आपण सुखी होऊ असं लोकांना वाटत होतं. हे मानस थेट १९६२ साली चीनकडून पराभव होईपर्यंत भारतात प्रभावी होतं. सुखाची स्वप्नं दाखवणारे आर्थिक प्रकल्प, भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि दुष्काळ असे तीन घटक भारतीय मन अस्वस्थ करत होते. हे सारं चित्रपटांमधून पुसटसं दिसणं स्वाभाविक होतं.
सामान्य माणसाच्या जीवनाला राजकीय वगैरे गोष्टी स्पर्शून जरूर जातात, पण तो त्याच्या जगण्याचा एक छोटा अंश असतो, ही राज कपूरची समजूत होती. माणसाला जगायचं असतं. तो स्वप्न पहातो. स्वप्नं अमलात आणण्याची धडपड करतो. जखमी होतो. हताश होतो. दुःखी होतो. तरीही स्वप्नं पहाणं सोडत नाही. त्याच्या स्वप्नात गाणी असतात, सेक्स असतो, रुतणारे काटे असतात, विरह असतो, मिलन असतं.
चिमूटभर सामाजिक आशय मणभर स्वप्नांचा खेळ हा फॉर्म्युला राज कपूरला सापडला.
राज कपूरनं नेहरू आणि समाजवादाची भलामण केली, असा आरोप झाला. पण ते कितपत खरं मानायचं? नेहरू देशाचे हीरो होते. त्यांचं नेहरूप्रेम, त्यांचा रशियाकडला कल इत्यादी गोष्टी केवळ राजकीय चर्चाकिचाट करणाऱ्यांचा विषय होता, सामान्य माणसाच्या लेखी तो एक राजबिंडा माणूस होता, देशाचं कल्याण करू पहाणारा माणूस होता.
राज कपूरच्या सिनेमात नेहरू बहुदा फक्त एकदाच आले. बूट पॉलीशमधे. तिथं जॉन चाचा आला होता. फक्त जॉन चाचा (डेविड) राजबिंडा नव्हता येवढंच. राज कपूरचा सिनेमा प्रवाहपतीत भारतीयाला बाहेर काढत होता. त्या अर्थानं, खूप आडवळणानं, त्याचा सिनेमा समाजवादी-नेहरूवादी होता.
‘आग’मध्ये नाट्य होतं. नायकाचे तीन प्रेमभंग होते. तीन नायिका होत्या. शेवटी ओरिजिनल नायिका नायकाच्या जीवनात परत येते आणि चित्रपटाचा सुखी शेवट होतो. स्वप्न. नायक एका स्वप्नाचा पाठलाग करतो, खूप त्रास सहन करतो, शेवटी स्वप्न साकार होतं.
चित्रपटात सात गाणी होती. गाणी एकापेक्षा एक होती. ‘जिंदा हूं इस तराह की जिंदगी नही…,’ हे मुकेशचं विरहगीत गाजलं. मुकेश आणि राज कपूर यांची गट्टी तिथून जुळली.
१९४९ मधे ‘बरसात’ आला. बरसातनं धमाल केली. कथानकात भरपूर नाट्य. भाबडे नायक नायिका. मित्र (प्रेमनाथ) हा वाईट्ट स्त्रीलंपट माणूस. दोघांच्याही जीवनात जाम तणाव आणि संघर्ष. शेवटी राजकपूरचं प्रेम यशस्वी होतं. वाईट्ट प्राणनाथनं त्याच्या मैत्रिणीला वाईट वागवलेलं असतं, चित्रपटाच्या शेवटी त्याला पश्चात्ताप होतो पण तेव्हां त्याची मैत्रीण मेलेली असते. गळादाटू शेवट.
शंकर जयकिशनचं संगीत. ‘हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमलका,’ ‘जिया बेकरार है,‘ ‘मुझे किसीसे प्यार हो गया,’ ‘बरसातमे ताक धिन धिन,’ ‘मेरे आखोमे बस गया रे,’ ‘पतली कमर है तिरछी नजर है,’ ‘मै जिंदगीमे हरदम रोता ही रहा,’ ‘छोड गये बालम,’ ‘बिछडे हुए परदेसी,’ अशी एकाहून एक भारी गाणी.
भारतीय माणसाला गाणी आवडतात. शास्त्रीय संगीत चिमूटभर लोकांना कळतं. जनतेला कळतं ते लोकसंगीत. लोकसंगीत हे लोकांचं संगीत असतं, लोकसंगीतातली गाणी कोणीही माणूस म्हणू शकतो, गुणगुणू शकतो. लोकसंगीत सामूहिक असतं. राज कपूरनं लोकसंगीत, लोकसंगीतातलं ढोलक हे वाद्य, कोरस, हे घटक त्याच्या गाण्यांत ठळकपणे आणले. राज कपूरच्या सिनेमांमधे अनेक संगीतकार होते, अनेक गायक होते. प्रत्येक संगीतकार आणि गायक आपापल्या परीनं थोर आणि वेगळा होता. तरीही ती गाणी राज कपूरची आहेत हे ठळकपणे कळत असे.
१९५१ मधे राज कपूरनं ‘आवारा’ केला.
‘आवारा’नं तर ‘बरसात’वरही मात केली. आवारात खूप गुंता, खूप उपकथानकं होती. राज कपूर गुन्हेगार असतो. त्याचा खरा नसलेला बाप गुन्हेगार असतो. राज कपूरचा खरा बाप जज असतो. राज कपूरवरचा खटला त्याच्या बापासमोरच उभा रहातो. राजकपूर हा आपला मुलगा आहे हे त्याच्या बापाला माहीत नसतं. राजकपूरची प्रेयसी. ती त्याच्या खऱ्या बापाकडं कामाला असते. राजकपूर खिसेकापू असला तरी तिचं त्याच्यावर प्रेम. जाम गुंते. भारतीय माणसाला आवडेल असाच शेवट. राज कपूरला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होते, पण ती कमी असते. गुन्ह्यासाठी शिक्षा झाली आणि शिक्षा भोगून नायक स्वच्छ झाला. फिट्टंफाट. शेवटी नायक नायिकेचं मीलन.
‘आवारा’त ११ गाणी होती. प्रत्येक गाणं एकापेक्षा एक भारी होतं. ‘आवारा’तली गाणी जगभर पोचली. ‘आवारा’ जगभर पोचला. ‘आवारा हूं ,’ हे गाणं जगभर गायलं गेलं.
१९५५ मध्ये ‘श्री ४२०.’ त्या सिनेमात ‘मेरा जूता है जपानी,’ हे गाणं होतं. तेही साऱ्या जगभर पोचलं. जगभर म्हणजे अगदी खरोखर जगभर. विशेषतः रशियात. रशियाचे अध्यक्ष बुल्गॅनिन यांनी म्हणे भारतीय शिष्टमंडळासमोर ते गाणं म्हटलं. रशियाचे आणखी एक अध्यक्ष भारतात आले आणि राज कपूर कुटुंबीयांना मुद्दाम भेटून गेले. तेव्हांही त्यांनी मेरा जूता है जपानी, आवारा हूँ या गाण्यांचा उल्लेख केला.
‘आवारा’मधे (१९५१) हवेलीमधे वाढलेला; उच्चभ्रू (न्यायाधीश); बापशाही मानणारा एक माणूस आहे. दुसरा माणूस आहे राज कपूर, फाटका, आगापीछा नसलेला; समाजानं गुन्हेगारीचा शिक्का मारून वाळीत टाकलेला. कथानक जाम नाट्यमय वळणं घेत फिरतं आणि शेवटी राज कपूरचा विजय होतो, न्यायाधीश नमतो, श्रीमंत मुलीचं फाटक्या राज कपूरशी जुळतं.
समाजातल्या श्रीमंत प्रतिष्ठिताला राज कपूरनं ‘आवारा’त नमवलं, समाजातल्या एका फाटक्या माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
‘श्री ४२०’ मधला बावळट, धांदरट, फाटका, अगदीच सामान्य माणूस असलेला राज कपूर म्हणतो की, तो इंटरनॅशनल आहे, त्याचे बूट जपानी, पँट ब्रिटीश आहे, डोक्यावर रशियाची लाल टोपी आहे पण त्याचं हृदय मात्र हिंदुस्तानी आहे.
इंटरनॅशनल माणूस ही भारताला परीचित नसलेली समाजवादी प्रतिमा राज कपूरनं चित्रपटात वापरली.
१९५४ मधे राज कपूरचा ‘बूट पॉलिश’ आला. त्यात तर नेहरू चाचा अगदी उघडपणेच होते. समाजातली गरीब मुलं. त्यांना वाईट मार्गाला लावायचा प्रयत्न एक बाई करत असे. जॉन चाचानं त्यांना बूट पॉलिश करून जगायला सांगितलं.
बूट पॉलिशनं गरीब माणसाला प्रतिष्ठा दिली.
असं म्हणा की या सिनेमांना काही आशय बिशय होता.
‘बॉबी’ ला काय म्हणायचं?
त्यात कुठंय देशभक्ती, समाजवाद, माती मसण?
प्रेम. ते साध्य करण्याची खटपट. संकटं. संकट निवारण. नाच आणि गाणी.
संगम.
दोन मित्र. दोघांचं एकाच स्त्रीवर प्रेम. आली पंचाईत. पुढं काय होणार? कोणी तरी एक माणूस नाहिसा झाल्याशिवाय मिलन कसं होणार? चित्रपटभर ही कहाणी पसरते. पात्रं परदेशात जातात. छान छान दृश्यं आपल्याला दिसतात. चित्रपटभर दर्दभरी गाणी.
‘जिस देशमे…’ मध्ये गंगा आशावादी संदेश देते. ‘राम तेरी गंगा,’ या बटबटीत बाजारू चित्रपटात बाजारू झालेला भ्रष्ट देश राज कपूर दाखवतो.
१९३५ (इन्किलाब) ते १९८८ (राम तेरी गंगा मैली) अशा ५३ वर्षाच्या कारकीर्दीत राजकपूरनं ७४ चित्रपट केले, काहीत कामं केली, काहींचं दिग्दर्शन केलं, काहींची निर्मिती केली.
राज कपूरची चित्रपटाच्या सर्व अंगांवर पकड होती.
पूर्ण सिनेमा पुरूष.
नवी दिल्ली : गुजरातच्या पोरबंदरमधील न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची एका खटल्यात निर्दोष मुक्तता केली. १९९७ च्या एका खटल्यात कोर्टाने हा निकाल दिला. त्यांच्याविरोधात पुरावे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. (Sanjiv Bhatt)
१९९७ मध्ये संजीव भट्ट पोरबंदरचे पोलीस अधीक्षक होते. त्यावेळी एका गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नारन जादवचा गुन्हा कबूल करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणात भट्ट यांच्यासह वाजूभाई चौ या पोलीस शिपायावरही गुन्हा दाखल झाला होता. चौ यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला.
खटल्याची पार्श्वभूमी
१९९४ मध्ये शस्त्रतस्करीच्या गुन्ह्यात २२ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात नारन जादवचाही समावेश होता. अटकेनंतर त्यांची रवानगी अहमदाबाद मध्यवर्ती कारागृहात झाली होती. पोरबंदर पोलिसांचे एक पथक ५ जुलै १९९७ मध्ये जादवला अहमदाबाद गेले. मध्यवर्ती कारागृहातून बदली वॉरंट घेऊन बाहेर पडले. तेथून भट्ट यांच्या पोरबंदरमधील निवासस्थानी घेऊन आले. तेथे माझा छळ करण्यात आला. यावेळी मला आणि माझ्या मुलाला विजेचे चटके देण्यात आले, असा आरोप जादवने केला होता.
तथापि, या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे सांगत पोरबंदरचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश पंड्या यांनी संजीव भट्ट यांची शनिवारी, ७ डिसेंबररोजी निर्दोष मुक्तता केली. (Sanjiv Bhatt)
कोर्टाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी त्यांच्यावर वेगवेगळ्या कोर्टात आणखी काही खटले सुरू आहेत. त्यामुळे भट्ट यांचा कायदेशीर संघर्ष यापुढेही सुरूच राहणार आहे.
कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण
- गुन्हा कबूल करण्यासाठी तक्रारदाराचा छळ करण्यात आला, त्यासाठी घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला किंवा त्याला धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादी पक्षाला सिद्ध करता आले नाही.
- भट्ट हे त्यावेळी वरिष्ठ सरकारी अधिकारी होते. त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यासाठी आवश्यक त्या सरकारी परवानग्या घेतल्या गेल्या नाहीत.
भट्ट यांच्याविरोधातील खटले आणि झालेल्या शिक्षा
- पोलीस कस्टडीतील मृत्यू प्रकरण (१९९०) : जामनगरमधील पोलीस कस्टडीत असताना एका आरोपीच्या मृत्यूप्रकरणात आजन्म कारावास.
- ड्रग प्लांटिंग (मार्च २०२४) : राजस्थानातील एका वकिलाला ड्रग्ज प्लांट प्रकरणात अडकवण्याच्या प्रकरणात २० वर्षाची शिक्षा.
- याशिवाय २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगल प्रकरणात पत्रकार आणि नागरिक अधिकार कार्यकर्ता तिस्ता सेट्लवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांच्यासह भट यांच्यावर खोट्या साक्षी पुरावे तयार केल्याचा आरोप
- तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगलीचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र विशेष तपास पथकाने (एसआयटी) हे सर्व आरोप फेटाळले होते.
- भट्ट यांना २०११ मध्ये निलंबित करण्यात आले. त्यानंतर २०१५ मध्ये ‘अनधिकृत अनुपस्थिति’चे कारण देत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सध्या ते राजकोट मध्यवर्ती कारागृहात आहेत.
हेही वाचा :
उधमपूर : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये रविवारी सकाळी अधिकाऱ्यांना पोलिस वाहनात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे गोळ्या झाडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उधमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांना मारण्यासाठी एके-४७ रायफलचा वापर करण्यात आला. उधमपूरचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे यांनी, हे दोघे पोलीस सोपोरहून तलवाडा प्रशिक्षण केंद्राकडे जात होते. हा हत्या आणि नंतर आत्महत्येची घटना असावी, असा अंदाज आहे. तथापि, घटनेमागील सत्य शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी ‘एएनआय’ला सांगितले. (Jammu Kashmir)
रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. ते सोपोरहून तलवाडा येथील प्रशिक्षण केंद्राकडे जात होते. प्राथमिक तपासानुसार, या घटनेत एके-४७ रायफल वापरल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांचे मृतदेह विच्छेदन आणि अन्य प्रक्रियेसाठी उधमपूरच्या जनरल मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात येणार असल्याचे एसएसपी नागपुरे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यातही असाचा प्रकार आढळला होता. एक मृतदेह सापडला होता. जम्मूच्या किश्तवाड भागात दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. सुरक्षा दलांनी या दोन ग्राम संरक्षण रक्षकांचे (व्हीडीजी) मृतदेह बाहेर काढले होते. दोघे बेपत्ता झाल्यानंतर सुमारे २४ तासांनंतर सुरक्षा दलांना त्यांचे मृतदेह पोंडगवारी पजम्रिसरात सापडले. (Jammu Kashmir)
हेही वाचा :