नवी दिल्ली : रस्ते अपघातविषयक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होतो तेव्हा मी तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, अशी कबुली केंद्रीय दळणवळण आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. मी पहिल्यांदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री झालो त्यावेळी अपघाताचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष ठेवले होते. मात्र रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातही उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात सर्वाधिक अपघाती मृत्यू होता. शहरांचा विचार करता यात राजधानी दिल्ली आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले. (Nitin Gadkari)
भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १.७८ लोकांपैकी ६० टक्के बळी हे १८ ते ३४ वयोगटातील आहे. अनेकांना कायद्याची भीती वाटत नाही. दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाही. सिग्नल तोडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अपघात होतात, असे गडकरी म्हणाले.
लोकसभेत रस्ते अपघातांवरील चर्चेदरम्यान गडकरी बोलत होते. काही वर्षांपूर्वी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा अपघात झाला होता. याबाबतचा अनुभवही त्यांनी सांगितला. या अपघातामुळे त्यांना बराच काळ रुग्णालयात राहावे लागले. मात्र ‘देवाच्या कृपेने मी आणि माझे कुटुंब वाचलो,’ असे ते म्हणाले. (Nitin Gadkari)
रस्ते अपघातात उत्तर प्रदेश आघाडीवर
उत्तर प्रदेशमध्ये, २३,००० पेक्षा जास्त लोक म्हणजे एकूण अपघाती मृत्यूंपैकी रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण १३.७ टक्के आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये १८,००० पेक्षा जास्त मृत्यू (१०.६ टक्के) झाले. महाराष्ट्रात १५,००० हून अधिक मृत्यू नोंदवले गेले. जे एकूण नऊ टक्के आहेत आणि मध्य प्रदेशात १३,००० पेक्षा जास्त मृत्यू म्हणजे ८ टक्के मृत्यू रस्ते अपघातातील आहेत.
शहरी भागातील रस्ते अपघातातील मृत्यूचा विचार करता, दिल्ली शहर (१,४०० मृत्यू) आघाडीवर आहे, त्यानंतर बेंगळुरू (९१५) मृत्यू आहेत. जयपूरमध्ये रस्ते अपघातात (८५०) मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक अपघात दोन दुचाकींमध्ये झाले आहेत, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा :