कोल्हापूर; प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आघाडी धर्म पाळताना काँग्रेस पक्ष विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा अन्यथा दहाही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले जातील असा इशाराही दिला. (Kolhapur Politics)
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आणि शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावून काँग्रेस पक्षाविरुध्द खदखद व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघ शरद पवार राष्ट्रवादीचा हक्काचा असताना ही जागा काँग्रेसला देण्यात आली तर हातकणंगले लोकसभा मतदार संघ शिवसेनेला देण्यात आला. लोकसभेच्या बदल्यात कोल्हापूऱ् उत्तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मान्य केले होते. विधानसभा निवडणुकीत आम्ही चार जागांची मागणी केली असता कागल आणि चंदगड या दोनच विधानसभा जागा देण्यात आली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातही वेगळी आघाडी उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे तो त्वरीत थांबवावा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार आम्हाला द्या अथवा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ द्यावा अशी मागणीही व्ही.बी. पाटील यांनी केली. (Kolhapur Politics)
हेही वाचा :