कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय असून त्यांना निर्णायक मताधिक्य देऊ, अशी ग्वाही अर्जुन इंगळे यांनी दिली.
आ. सतेज पाटील म्हणाले, प्रत्येकाला सोबत घेऊन आमदार ऋतुराज पाटील हे काम करत आहेत. त्यांना ताकद देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे कार्यकत्यांनी मतदारापर्यंत पोहोचवून दक्षिणला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या. आ. ऋतुराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचे पाठबळ मला लढायला बळ देत असून मतदार संघातील वाढत्या पाठबळाच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे. दक्षिणचा विकास आणखी वेगाने करण्यासाठी आपण सर्वजण एकसंधपणे काम करूया.
यावेळी महाडिक गटाचे कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरीचे ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, राहूल शिंदे, माजी ग्रा.पं. सदस्य महेश शिंदे, प्रमोद धनवडे, राजू इंगळे, अमित चव्हाण, संतोष धनवडे, कृष्णात माळी, लखन गणेशाचार्य, अक्षय धनवडे, अमोल धनवडे, गोकुळ शिरगावचे संदिप टोपकर आदी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गोकुळ संचालक विश्वास पाटील, डॉ. चेतन नरके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी मनोगत व्यक्त केले. गोकुळचे संचालक बाबासो चौगले, प्रकाश पाटील, सुयोग वाडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.